• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली पोलिस ॲक्शन मोडवर.? खुनातील संशयितांची होणार ओळखपरेड.!

Admin by Admin
February 2, 2026
in क्राईम
1 min read
0
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीतील लिमये मळा येथे क्रांतिकुमार बापूसाहेब शेडबाळे यांचा खून करण्यात आला होता. तर नशेखोर हल्लेखोरांच्या हल्ल्यात सुयश क्रांतिकुमार शेडबाळे हा गंभीर जखमी झाला होता.

दरम्यान अल्पवयीन हल्लेखोरासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची न्यायालयासमोर ओळखपरेड होणार असल्याचे विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.

मयत क्रांतिकुमार शेडबाळे हे इनामधामणीमध्ये राहण्यास आहेत. ते शनिवारी रात्री इनामधामणी ते स्फूर्ती चौककडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या हेडलाईटचा उजेड लिमये मळा येथे अंधारात नशा करत बसलेल्या हल्लेखोरांच्या चेहऱ्यावर पडला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी क्रांतिकुमार शेडबाळे यांना चेहऱ्यावर उजेड का पाडला? अशी विचारणा केली. त्यावेळी हल्लेखोरांना त्यांना शिवीगाळ केली. तसेच क्रांतिकुमार यांनीही येथे तुम्ही बसायचे नाही, असे म्हणून तेथून दुचाकीवरून निघून गेले. परंतु या झटापटीमध्ये क्रांतिकुमार यांचा मोबाईल मात्र लिमये मळ्यातील कच्च्या रस्त्यावर पडला.

त्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास क्रांतिकुमार हे त्यांचा मुलगा सुयश याला घेऊन त्यांचा मोबाईल शोधण्यासाठी परत त्या ठिकाणी दुचाकीवरून त्या ठिकाणी आहे. त्यावेळीही तिघे संशयित हल्लेखोर त्याच ठिकाणी नशा करत बसले होते. क्रांतिकुमार परत मुलाला घेऊन आल्याने संशयित हल्लेखोरांनी पुन्हा दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी जोरदवार वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर मात्र संशयितांनी क्रांतिकुमार यांच्या डोक्यात दडग घालून त्यांना जागीच ठार केले. तर सुजय यालाही दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. परंतु सुयश याने आरडाओरडा केल्याने तेथून काही अंतरावर सुरू असणाऱ्या बाजारातील नागरीकांनी तीन पैकी दोन संशयितांना पकडून त्यांना बेदम चोप दिला. दरम्यान सुयश शेडबाळे याने याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तीन अनोळखी संशयितांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन हल्लेखोरासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Previous Post

लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक, मिरजेतील एकावर गुन्हा दाखल

Next Post

सांगली ब्रेकिंग | जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये.? बड्या नेत्याचा मोठा दावा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये.? बड्या नेत्याचा मोठा दावा

सांगली ब्रेकिंग | जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये.? बड्या नेत्याचा मोठा दावा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group