• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये.? बड्या नेत्याचा मोठा दावा

Admin by Admin
February 2, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये.? बड्या नेत्याचा मोठा दावा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेषत: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरु लागल्या आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा, भाजप नेत्याने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा भाजप नेते, आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

“आता काटा उलटा फिरायला लागलाय,लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत,थोडया दिवसात ते भाजपात येतील, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले आहे. भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही,ते बघावे, कारण सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही, कधी उडी मारायचे, ते बघायला लागले आहे,असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.

दरम्यान, या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्त्वाचे विधान केले. मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळेच 50 आमदारांचा आणि लोकांचाही माझ्यावर विश्वास आहे, असं ते म्हणाले. सांगलीची माणसं फक्त चांगली नाहीत तर देव माणस आहेत आणि चांगल्या माणसांसाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं, असा शब्दही त्यांनी सांगलीकरांना दिला.

दरम्यान, वाळवा ग्रामपंचायतचे नगरपंचायत करण्याबाबत प्रस्तावावर आचारसंहिता संपल्यावर नक्कीच विचार केला जाईल असा आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी वाळवेकरांना दिले, या सभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत,वाळव्याचे माजी सरपंच गौरव नायकवडी यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सांगली पोलिस ॲक्शन मोडवर.? खुनातील संशयितांची होणार ओळखपरेड.!

Next Post

खळबळजनक | अजितदादांचा अपघाती अंत, ‘तो’ पायलट जिवंत; बायकोनं ‘स्टोरी’ टाकली अन् खरी स्टोरी समोर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खळबळजनक | अजितदादांचा अपघाती अंत, ‘तो’ पायलट जिवंत; बायकोनं ‘स्टोरी’ टाकली अन् खरी स्टोरी समोर

खळबळजनक | अजितदादांचा अपघाती अंत, 'तो' पायलट जिवंत; बायकोनं 'स्टोरी' टाकली अन् खरी स्टोरी समोर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group