• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आमदार पडळकरांच्या समर्थकांकडून शिंदे गटाच्या गाड्यांची तोडफोड.!

Admin by Admin
February 1, 2026
in क्राईम, राजकीय
1 min read
0
आमदार पडळकरांच्या समर्थकांकडून शिंदे गटाच्या गाड्यांची तोडफोड.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्ह्यातील आटपाडीत विभूती वाढीमध्ये भाजपचा प्रचार सुरु होता. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची गाडी सभेच्या ठिकाणी फिरत असल्याने सभेला अडथळा निर्माण झाला होता.आटपाडी मध्ये विभूती वाडी येथे माधवी महादेवी ब्रह्मानंद पडळकर या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आहेत.

त्यांच्या प्रचारासाठी सभा होणार होती. परंतु, या सभेदरम्यान लाऊड स्पीकर असलेली प्रचाराची गाडी अडथळा ठरत होती. त्यामुळे पडळकर समर्थकांनी ते वाहन हटवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर शिंदे गटाचे आणि पडळकरांचे समर्थक ऐकमेकांना भिडले. त्यावेळी पडळकर समर्थकांनी प्रचाराची गाडी फोडली,असा आरोप केला जात आहे.

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार राड्याचा प्रकार घडला आहे. आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आटपाडीतील तालुक्यातल्या विभूतवाडी येथे हा प्रकार घडला आहे.

शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे. आटपाडीच्या निबंवडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणूक लढवत आहेत.

या प्रचारा दरम्यान विभुतेवाडी येथे माधवी पडळकरांची सभा सुरू असताना शिवसेना शिंदे गटाच्या विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली,यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही गटात वादविवाद झाला.पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केली.

Previous Post

ब्रेकिंग | भरधाव इनोव्हाची चार दुचाकी आणि पादचाऱ्यांना धडक, गाड्यांचा चक्काचूर, संतप्त नागरिकांनी चालकाला चोप देत इनोव्हा फोडली.!

Next Post

रेल्वे प्रकल्पासाठी 23 हजार कोटीची तरतूद,मिरज नेहमीच वंचित..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रेल्वे प्रकल्पासाठी 23 हजार कोटीची तरतूद,मिरज नेहमीच वंचित..?

रेल्वे प्रकल्पासाठी 23 हजार कोटीची तरतूद,मिरज नेहमीच वंचित..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group