• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले..!

Admin by Admin
February 1, 2026
in क्राईम
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सुनील गुरव याला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदारांकडून सहा लाख रुपये लाच घेताना अटक केली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती.

रात्री उशिरा सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

सहायक निरीक्षक सुनील गुरव याच्याकडे मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात मालगाव परिसराचा कार्यभार आहे. काही दिवसापूर्वी पोलिसात दाखल गुन्ह्यात तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी गुरव याने तक्रारदाराकडे सहा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने काल मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरव यास पकडण्यासाठी सापळा लावला होता. सायंकाळी सहा वाजता पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून सहा लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरव यास पकडले. याबाबत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली.

Previous Post

सांगलीत महिनाभरात तब्बल ६ खून.! पोरासमोर बापाला ठेचून संपवलं, मुलालाही जबर मारहाण, निष्पापाचा गर्दुल्यांकडून बळी.?

Next Post

ब्रेकिंग | भरधाव इनोव्हाची चार दुचाकी आणि पादचाऱ्यांना धडक, गाड्यांचा चक्काचूर, संतप्त नागरिकांनी चालकाला चोप देत इनोव्हा फोडली.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | भरधाव इनोव्हाची चार दुचाकी आणि पादचाऱ्यांना धडक, गाड्यांचा चक्काचूर, संतप्त नागरिकांनी चालकाला चोप देत इनोव्हा फोडली.!

ब्रेकिंग | भरधाव इनोव्हाची चार दुचाकी आणि पादचाऱ्यांना धडक, गाड्यांचा चक्काचूर, संतप्त नागरिकांनी चालकाला चोप देत इनोव्हा फोडली.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group