• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत महिनाभरात तब्बल ६ खून.! पोरासमोर बापाला ठेचून संपवलं, मुलालाही जबर मारहाण, निष्पापाचा गर्दुल्यांकडून बळी.?

Admin by Admin
February 1, 2026
in क्राईम
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | जीपमधून २४.९० लाखांचा सुगंधी तंबाखू-पानमसाला जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली शहरात खुनाच्या घटनांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.शहरातील इनाम धामणी रोडवर रात्री एका बाप-लेकावर हल्ला करत मुलाच्या सामोरंचं बापाला दगडाने ठेचून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कीर्ती कुमार शेडबाळे (वय 50) असं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर हल्ल्यामध्ये मुलगा जखमी झाला आहे. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांना संतप्त जमावाने पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून नेमका कोणत्या कारणातुन खून झाला,हे स्पष्ट होऊ शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती कुमार शेडबाळे हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणी परिसरातील कच्च्या रस्त्यावरून जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन संशयित व्यक्तींशी त्यांचा किरकोळ वाद झाला. हा वाद क्षणातच विकोपाला गेला. संतप्त झालेल्या संशयितांनी बाप लेकवर अचानक हल्ला चढवला.

या हल्ल्यात कीर्ती कुमार शेडबाळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जागीच ठार मारण्यात आले, तर मुलालाही मारहाण करण्यात आली. वडिलांचा खून मुलाच्या समोरच झाल्याने ही परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित हल्लेखोरांना स्थानिक नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेमका वाद कशावरून झाला आणि हल्ल्यामागचं कारण काय होतं, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. सांगलीत वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Previous Post

महाराष्ट्र हादरला! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

Next Post

मिरज ब्रेकिंग | सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ब्रेकिंग | सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले..!

मिरज ब्रेकिंग | सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना चहाच्या टपरीवर रंगेहाथ पकडले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group