• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | शिंदेसेनेच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काहीच अडचण नाही – मंत्री चंद्रकांत पाटील

Admin by Admin
January 18, 2026
in राजकीय
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | शिंदेसेनेच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काहीच अडचण नाही – मंत्री चंद्रकांत पाटील
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

निवडणुकीनंतर सांगली महापालिकेत अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली पण शिंदे सेना भाजपसोबत येणार असल्याने सांगलीत सत्ता स्थापन करण्यात भाजपला काही अडचण येणार नाही असे भाजपचे नेते आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सांगली महापालिकेत भारतीय जनता पक्षाला ७८ पैकी ३९ जागा मिळाल्या त्यामुळे त्यामुळे बहुमतासाठी एका जागेची गरज आहे. शिवसेना शिंदे गटाला दोन जागा मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी या दोन जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भाजपचे संख्याबळ ४१ होत आहे. असेही मंत्री पाटील म्हणाले ‌. दरम्यान महापालिकेत सत्तेमध्ये सहभागी व्हायचे असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ठरवले असल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, मात्र त्यांनी सत्तेत काय हवे याबाबत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करावी असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीमध्ये पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची व आमदारांशी चर्चा केली. जिल्हा परिषद निवडणूकी मध्ये उमेदवार निवड तसेच घटक पक्षांच्या बरोबरच्या युतीबाबत यामध्ये विचार विनिमय करण्यात आला.

यावेळी आमदार सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, दीपक बाबा शिंदे, पृथ्वीराज बाबा देशमुख, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, वैभव पाटील, चिमण डांगे, शेखर इनामदार, राजाराम गरुड, डॉ. रविंद्र आरळी यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

भोसे जिल्हा परिषद गटात ठाकरे सेनेला धक्का, शिंदेसेनेची ताकद वाढली; १२ गावातील शेकडो कार्यकर्त्यांसह विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखाचा शिंदे सेनेत प्रवेश..!

Next Post

‘झेडपी’च्या तोंडावर राजू शेट्टींच्या खंद्या समर्थकाचा भाजपात प्रवेश!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘झेडपी’च्या तोंडावर राजू शेट्टींच्या खंद्या समर्थकाचा भाजपात प्रवेश!

'झेडपी'च्या तोंडावर राजू शेट्टींच्या खंद्या समर्थकाचा भाजपात प्रवेश!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group