• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भोसे जिल्हा परिषद गटात ठाकरे सेनेला धक्का, शिंदेसेनेची ताकद वाढली; १२ गावातील शेकडो कार्यकर्त्यांसह विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखाचा शिंदे सेनेत प्रवेश..!

जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.!

Admin by Admin
January 18, 2026
in राजकीय
1 min read
0
भोसे जिल्हा परिषद गटात ठाकरे सेनेला धक्का, शिंदेसेनेची ताकद वाढली; १२ गावातील शेकडो कार्यकर्त्यांसह विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखाचा शिंदे सेनेत प्रवेश..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेला दणका मिळाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांसाठी आता मैदान तापू लागले आहे. उबाठा सेनेला मिळालेले अपयश व शिंदे सेनेला मिळालेले यश पाहता, निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मिरज तालुक्यात उद्धवसेनेला जोरदार धक्का मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे भोसे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख यांच्यासह इतर पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने शिंदेसेनेला बळ मिळाले आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये सोनी गावचे श्री. सागर सुरेश नरुटे हे भोसे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख व मानमोडी गावचे उपसरपंच श्री. रामचंद्र शिवाजी साळुंखे हे उपविभागप्रमुख होते. त्यांनी १२ गावांमध्ये कार्यकर्त्यांची बांधणी केली असून युवा कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे.

शनिवारी सायंकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महानगरप्रमुख प्रा. मोहन वनखंडे, नवनिर्वाचित नगरसेवक युवा नेते सागर वनखंडे, ज्येष्ठ नेते शंकर शिंदे, कवलापूरचे युवा नेते पै. मोहन शिंदे यांच्या उपस्थितीत नरुटे व साळुंखे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश केला.

यावेळेस जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जोरदार ताकद लावून शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळवून देऊन विजयी करणार असल्याचे भोसे जिल्हा परिषद गटाचे नेते सागर नरुटे व रामचंद्र साळुंखे यांनी सांगितले.

Previous Post

शिंदेसेनेच्या २ जागा सत्तेची समीकरणे ठरवण्यासाठी अत्यंत निर्णायक ; मिरजेतून सागर वनखंडे यांनी सेनेसाठी खाते उघडले..!

Next Post

सांगली ब्रेकिंग | शिंदेसेनेच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काहीच अडचण नाही – मंत्री चंद्रकांत पाटील

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | शिंदेसेनेच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काहीच अडचण नाही – मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली ब्रेकिंग | शिंदेसेनेच्या मदतीने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काहीच अडचण नाही - मंत्री चंद्रकांत पाटील

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group