• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“कोणीही यावे आणि पसरावे हे चालणार नाही, सभापती निवासातील मुक्काम ठोकलेल्यांची हकालपट्टी” ;ऍडीशनल सीईओ गुडेवार यांची धडक कारवाई..

Admin by Admin
May 13, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली : प्रारूप प्रभाग रचना 2 जूनला प्रसिद्ध होणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; जिल्हा परिषदेच्या सभापती निवासांमध्ये बेकायदा राहणाऱ्यांची गुरुवारी हकालपट्टी करण्यात आली.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी ही कारवाई केली. कोणीही यावे आणि पथारी पसरावी असा प्रकार चालणार नसल्याचा इशारा दिला.

जिल्हा परिषदेच्या सभापती व अधिकाऱ्यांसाठी त्रिकोणी बागेजवळ निवासस्थानांची व्यवस्था आहे. सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांचा कार्यकालावधी २१ मार्च रोजी संपला. त्यानंतर सभापतींनी बंगले रिकामे केले, पण त्यातील काहींच्या किल्ल्या जिल्हा परिषदेकडे जमा झालेल्या नव्हत्या. बंगल्यांत पदाधिकारी सध्या राहण्यास नसले, तरी अनाहुतांकडून वापर मात्र सुरूच होता.

यासंदर्भात काही सजग नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांची भेट घेतली. बंगल्यांच्या गैरवापराची माहिती दिली. त्यानंतर आज गुडेवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह बंगल्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी तेथे काही जणांनी मुक्काम ठोकल्याचे निदर्शनास आले.

एका बंगल्यात काही विद्यार्थी राहिले होते, तर अन्य एका बंगल्यात कोणीतरी कार्यकर्ता राहण्यास होता. तिसऱ्या बंगल्यातही दोघा-तिघांनी मुक्काम ठोकल्याचे दिसून आले. गुडेवार यांनी तातडीने बंगले रिकामे करण्यास सांगितले, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. नवी कुलुपे लावण्याची प्रशासनाला सूचना केली. त्यानंतर संबंधितांनी बंगल्यातून काढता पाय घेतला.

दरम्यान, सभापतींना राहण्यासाठी बंगले दिले असले, तरी गेल्या पाच वर्षांत तेथे सहकुटुंब कोणीही राहिले नाही. एखाद्या-दुसऱ्या सभापतीनींच दोन-तीन महिन्यांपुरता मुक्काम ठोकला होता. अत्यंत टापटीप आणि सुरक्षित असलेल्या बंगल्यांचा वापर पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनीच वेगवेगळ्या उद्योगांसाठी केला. अशा उद्योगी कार्यकर्त्यांना गुडेवार यांनी आज हाकलून लावले.

जिल्हा परिषदेच्या इमारतींचा सर्रास गैरवापर

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जिल्हाभरातील इमारतींचा असाच गैरवापर सर्रास सुरू आहे. गरजूंच्या उपयोगासाठी म्हणून दिल्या असताना तेथे दुसरेच उद्योग सुरू आहेत. त्यांचीही झाडाझडती घेतली जाणार आहे.

Previous Post

“खळबळजनक | कॅप्टन एस पी दीक्षित गेडाम इन ऍक्शन मोडवर..? विट्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गृहमंत्र्याच्या टेबलावर..! डान्स बारमधील बारबालांचा खेळ सोशल मिडियात..?”

Next Post

देवेंद्रजी, शरद पवारांचा ‘खून’ च करा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
देवेंद्रजी, शरद पवारांचा ‘खून’ च करा..!

देवेंद्रजी, शरद पवारांचा 'खून' च करा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group