-
निरंजन आवटी यांच्या विकासकामांवर जनतेचा ठाम विश्वास..!
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपच्या निरंजन आवटी यांच्यासह पॅनेलमधील सर्व उमेदवारांना मिळणारे वाढते जनसमर्थन विरोधकांची चिंता वाढवत आहे. नागरिकांतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभागातील वातावरण चांगलेच रंगले असून जनता या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर भाजपलाच मत देणार असल्याचे आता स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अमननगर, शेवकारे प्लॉट, इंदिरानगर, ब्राह्मणपुरी या भागातील विकासकामे निरंजन आवटी यांनी अगदी मनापासून केली. शहरातील विविध चौक सुशोभीकरण ही निरंजन आवटी यांनीच केले आहेत. प्रभागातील नागरिकांशी सामाजिक बांधिलकी जपणारे निरंजन आवटी हे केवळ विकास पुरुष नाहीत तर समाजाशी नाळ जोडलेले नेतृत्व आहे. त्यांच्या प्रचारामध्ये महिलावर्ग मोठ्या उत्स्फूर्तने सहभागी झालेला दिसून येतो.
युवा वर्गामध्ये निरंजन आवटी यांची मोठी क्रेझ आहे. तरुणांच्या हाताला काम देण्यापासून ते तरुण निर्व्यसनी बनला पाहिजे याकरिता निरंजन आवटी नेहमीच धडपडत असतात.
गोपनीय खबऱ्याशी बोलताना, निरंजन आवटी यांनी केलेल्या कामांची माहिती देत जनतेचा विश्वास अधिक दृढ असल्याचे सांगितले. निरंजन आवटी यांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक व नोकरदार वर्ग यांचा पाठिंबा मोठा आहे. प्रभाग क्रमांक चार मधील विकासाचे खरे शिल्पकार निरंजन आवटी हे असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना कामाच्या जोरावरती संधी देण्यासाठी नागरिक तयार आहेत. विजय निश्चित असल्याचा विश्वास निरंजन आवटी यांनी यावेळेला व्यक्त केला.

