-
एकता कॉलनीतील एकीचे बळ, नागरिकांनी दिला संपूर्ण पॅनेल विजयी करण्याचा विश्वास..!
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत २० प्रभागांतून ७८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. मिरज शहरात प्रभाग क्रमांक ३,४,५,६,७, आणि २० हे प्रभाग आहेत. यातील विकासाच्या दृष्टीने सुधारलेला प्रभाग ४ ची ओळख आहे. निरंजन आवटी यांनी यासाठी खूप प्रयत्न केलेत.
सोमवारी रात्री प्रभाग क्रमांक चार मधील एकता कॉलनी येथे नागरिकांशी संवाद साधत असताना यापूर्वीही काम करत आलोय, कामाच्या जोरावरती आपल्यासमोर मी मत मागतोय, पुन्हा एकदा माझ्यासहित माझ्या सर्व सहकाऱ्यांना संधी देऊन संपूर्ण पॅनेल विजयी करण्याचं आवाहन यावेळी निरंजन आवटी यांनी केले आहे.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचा प्रचार आघाडीवर आहे. भाजपच्या उमेदवारांना अजून बळकट करण्यासाठी एकता कॉलनी येथे आयोजित सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. आरपीआयच्या पाठिंबामुळे जनसमर्थन वाढले असून विरोधकात चिंतेच वातावरण आहे.
प्रभाग क्रमांक ४ मधील काही महत्त्वाच्या भागांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद मोठी आहे. एकता कॉलनी मधील जनतेची एकता पाहून मला आनंद आणि अभिमान वाटला,असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रा. अभिजीत आठवले (सर), नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक यांनी आपला भक्कम असा पाठिंबा जाहीर केला.

मतदानाच्या अगोदर दोन दिवस आरपीआयने जाहीर केलेल्या पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ही लढत आता नक्कीच चुरशीची होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निरंजन आवटी बोलताना म्हणाले, लोकनेते चळवळीचे खरे वारसदार माजी महापौर स्व. विवेकरावजी कांबळे यांचे माझ्या आजोबापासून माझ्या कुटुंबाशी संबंध होते. ते नेहमीच आमच्या सुखदुःखात होते. आत्ता त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आमच्या सुखदुःखात असल्याची जाणीव आम्हाला आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण, त्यांनी माझ्या संपूर्ण पॅनेलला विश्वास देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.
“प्रभाग क्रमांक ४ मधील इंदिरानगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज मोठा दिमाखात उभा आहे. त्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत. अजूनही त्याचं सुशोभीकरण करण्याकरता माझे प्रयत्न असणार आहेत. बुद्ध विहाराचं काम मंजूर असून येत्या काही दिवसात तेही पूर्ण होईल. अर्ध्या रात्री तुमच्या मदतीला कोण येते, याचा विचार करून मतदान करा. तुम्ही हाक द्या, आम्ही साथ देतो.” प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपचे संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी करा – निरंजन आवटी, प्रभाग क्रमांक ४ चे भाजपचे अधिकृत उमेदवार.

