• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांनंतर अजित पवारांनीही सांगलीकरांना दाखविले ‘गाजर’

Admin by Admin
January 11, 2026
in राजकीय
1 min read
0
मुख्यमंत्र्यांनंतर अजित पवारांनीही सांगलीकरांना दाखविले ‘गाजर’
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

शेरी नाल्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याबरोबर सांगली नगरीत अद्यावत भाजी मंडई, रस्ते, गटारींचे प्रश्न सोडवू, अशा अनेक घोषणांची बरसात करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकत सांगलीकर जनतेला आशेचे गाजर दाखवले.

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज मिरज शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. राज्यात सत्तेत एकत्र असणारे महायुतीतील घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी (अजित पवार गट) सांगली महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढत आहे. मिरजेतील किसान चौकात झालेल्या सभेत अजित पवार गटाचे उमेदवार तसेच आमदार इद्रिस नाईकवाडी, माजी खासदार संजयकाका पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

चार दिवसांपूर्वी भाजपाचा निवडणूक प्रचारचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगलीत झाला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने जनता विसरत नाही, तोपर्यंत उपमुख्यमंत्री पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक आश्वासनाची बरसात केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच त्यांच्या पक्षाचे उमेदवार अजीम काजी यांना कालच हद्दपार करण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना थांबवत पवार यांनी आपले भाषण आवरते घेतले.

Previous Post

प्रभाग क्रमांक २ मधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य केवळ महाविकास आघाडीमध्येच – सौ. सविता शेडजी मोहिते

Next Post

सांगलीत माजी उपमहापौरसह आठजण भाजपमधून निलंबित..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजपचा काँग्रेसला धक्का, पाच माजी नगरसेवक फुटणार? देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात पाऊल ठेवताच टार्गेट १२५ ची चर्चा!

सांगलीत माजी उपमहापौरसह आठजण भाजपमधून निलंबित..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group