• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हा पोलीस दलात उडाली खळबळ…

Admin by Admin
May 13, 2022
in क्राईम
1 min read
0
पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हा पोलीस दलात उडाली खळबळ…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेशी ओळख झाली. ब्रम्हपुरी येथे कार्यरत असताना आरोपी यांनी सदर पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

ब्रम्हपुरी पासून आरोपी हा वेगवेगळ्या ठिकाणी बदलून गेला, त्या त्या ठिकाणी तो पीडित महिलेला बोलावत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करत होता.

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे पोलीस निरक्षक म्हणून कार्यरत असलेले पोलीस अधिकारी राजेंद्र शेटे यांच्या विरोधात ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये १५ वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या वडनेर येथे पोलीस निरक्षक असलेले पोलीस अधिकारी राजेंद्र शेटे यांनी मागील १५ वर्षांत लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून अत्याचार केले.

ब्रम्हपुरीत एका महिलेच्या तक्रारीवरून पोलीस अधिकारी राजेंद्र शेटे यांच्या विरोधात ब्रम्हपुरी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी राजेंद्र शेटे हे २००७ वर्षा दरम्यान ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांची ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेशी ओळख झाली. ब्रम्हपुरी येथे कार्यरत असताना आरोपी यांनी सदर पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ब्रम्हपुरी पासून आरोपी हा वेगवेगळ्या ठिकाणी बदलून गेला, त्या त्या ठिकाणी तो पीडित महिलेला बोलावत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करत होता.

नुकतेच आरोपीने ३० मार्च २०२२ रोजी फिर्यादी महिलेला नागभीड तालुक्यातील घोडझरी येथे भेटायला बोलावले होते. दरम्यान, फिर्यादी महिलेने लग्नाबद्दल विचारले असता भांडण होऊन आरोपीने तिला मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित महिलेने सदर प्रकरणाची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी पोलीस अधिकारी राजेंद्र शेटे विरोधात भादंवि कलम ३७६ (२) (एन), ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला भेट दिल्याची माहिती आहे.

Previous Post

“पोलिसांना फक्त १० मिनिटे बाजूला करा, या ओवीसीला मी औरंगजेबाकडे पाठवतो ; राज्यात ‘नामर्दाचं’ सरकार..!”

Next Post

“खळबळजनक | कॅप्टन एस पी दीक्षित गेडाम इन ऍक्शन मोडवर..? विट्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गृहमंत्र्याच्या टेबलावर..! डान्स बारमधील बारबालांचा खेळ सोशल मिडियात..?”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

"खळबळजनक | कॅप्टन एस पी दीक्षित गेडाम इन ऍक्शन मोडवर..? विट्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गृहमंत्र्याच्या टेबलावर..! डान्स बारमधील बारबालांचा खेळ सोशल मिडियात..?"

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group