• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीच्या पोलीस अधिकाऱ्याची पुण्यात आत्महत्या; लॉजमध्ये विष पिऊन संपवलं जीवन..!

Admin by Admin
January 7, 2026
in क्राईम
1 min read
0
सांगलीच्या पोलीस अधिकाऱ्याची पुण्यात आत्महत्या; लॉजमध्ये विष पिऊन संपवलं जीवन..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

राज्याच्या पोलीस विभागातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पुण्यातील एका लॉजमध्ये विष प्राशन करून जीवन संपवले आहे.

आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सूरज मराठे असे असून ते सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, शारीरिक आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीतील एका लॉजमध्ये घडली आहे.

सूरज मराठे यांची अवघ्या २५ व्या वर्षी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. पुणे जिल्ह्यातील देहू येथे त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सांगली पोलीस दलात कार्यरत असताना त्यांना काही दिवसांपासून आजारपणाचा त्रास होत होता. विशेषतः गुडघ्याच्या वेदनांमुळे ते उपचारासाठी वारंवार पुण्यात येत असल्याची माहिती आहे. याच कारणामुळे त्यांनी काही दिवसांची रजा घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, उपचारासाठी पुण्यात आल्यानंतर सूरज मराठे संबंधित लॉजमध्ये थांबले होते. उपचार करून परत आल्यानंतर त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली असून, त्यामध्ये आजारपणाचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र चिठ्ठीतील मजकूराबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

Previous Post

प्रभाग क्र.४ मध्ये राष्ट्रवादीच्या पॅनेल उमेदवारांचा प्रचारात झंझावात

Next Post

ब्रेकिंग | निवडणूक प्रचारावरुन भाजप समर्थकांकडून काँग्रेस समर्थकास मारहाण..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

ब्रेकिंग | निवडणूक प्रचारावरुन भाजप समर्थकांकडून काँग्रेस समर्थकास मारहाण..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group