• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महापालिका निवडणूक : बिनविरोधसाठी भाजपकडून १० लाखांची ऑफर; काँग्रेस उमेदवाराचा आरोप

Admin by Admin
January 6, 2026
in राजकीय
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

निवडणुकीपूर्वीच महायुतीची विजय घोडदौड सुरू आहे. मुंबई, पुण्यातील महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले असताना आता उपराजधानी नागपूर येथेही बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना बळ मिळताना दिसत आहे.

या संदर्भात थेट आरोप काँग्रेसने आज उमेदवारांच्या मार्गदर्शन मेळाव्यातून केल्याने खळबळ माजली आहे.

स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोध निवडणुकीमुळे विरोधकांना मिरच्या झोंबत असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात आज तीन जाहीर सभा आहेत. नागपुरातील प्रभाग २९ मधील महापालिकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रामचंद्र गजबे या काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपने चक्क १० लाखांची ॲाफर दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

याला महत्वाचे कारण म्हणजे प्रभाग क्रमांक २९ मध्ये काँग्रेस आणि भाजप असे दोनच उमेदवारी अर्ज आले होते. त्यामुळे हा अर्ज मागे घेऊन भाजपला ही निवडणूक बिनविरोध करायची होती, असा आरोप रामचंद्र गजबे यांनी यावेळी केला. आठ प्रभागात भाजप, काँग्रेसच्या थेट लढतीचा दावा शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला.

नागपुरातील महाकाळकर सभागृह येथे आज मंगळवारी दुपारी झालेल्या काँग्रेस उमेदवार मेळाव्यात रामचंद्र गजबे यांचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दक्षिण नागपूरचे काँग्रेसचे विधानसभा उमेदवार गिरीश पांडव यांनी याकडे लक्ष वेधले होते. आता भाजप या आरोपांना, काँग्रेसने आज विविध आकर्षक योजनांचा समावेश असलेल्या जाहीरनाम्याला कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड

Next Post

तुकाराम मुंढेंच्या निर्णयानं शिक्षण खातं हादरलं; एका दणक्यात तीन शिक्षक तडकाफडकी निलंबित

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तुकाराम मुंढेंच्या निर्णयानं शिक्षण खातं हादरलं; एका दणक्यात तीन शिक्षक तडकाफडकी निलंबित

तुकाराम मुंढेंच्या निर्णयानं शिक्षण खातं हादरलं; एका दणक्यात तीन शिक्षक तडकाफडकी निलंबित

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group