खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज शहरातील प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार उद्योजिका तृप्ती कांबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांचा प्रचारामध्ये झंजावात सुरू आहे.
महिलांच्या मध्ये मोठी क्रेझ निर्माण होत असून उद्योजिका सौ तृप्ती कांबळे ह्या रोज नवनवीन घोषणा जाहीर करीत आहेत. विकास कामांचा आराखडा तयार असून प्रभाग क्रमांक २० ला अत्याधुनिक सेवेसहित विकासाचे मॉडेल बनवणार असल्याचे उद्योजिका तृप्ती कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रभागातील पवार गल्ली, पाटील गल्ली, कृष्णा घाट परिसर व यासहित वाड्या वस्तींवरती घरोघरी जाऊन भेटीगाठी सुरू आहेत. महिलांच्यासाठी संकल्प असलेल्या विशेष योजना व उपक्रम हे मात्र जोरदार चर्चेत असून उद्योजिका तृप्ती कांबळे यांच्या नावाचा जयघोष महिलांच्या तोंडातून दिसून येत आहे.

