खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महाराष्ट्रातील राजकारणाला एक नवी दिशा देण्यासाठी भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या काही प्रमुख चेहऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक २० मधून सुनील गवळी यांचं नाव अग्रक्रमाने पुढे येत आहे.
सुनील गवळी यांना साथ देण्यासाठी प्रभाग क्रमांक २० मधून विद्यार्थी वर्ग सुद्धा आपला सहभाग दाखवत आहेत. चिमुकल्यांच्या या साथीने सुनील गवळी यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला अजून बळ मिळाल्याने निवडणुकीत विजयाची खात्री जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट मत जाणकार मंडळींनी मांडले आहे.
सुनील गवळी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा आदर्श घेण्यासारखा आहे. उमेदवार गवळी हे कार्यसम्राट नगरसेवक म्हणून परिचित असलेल्या योगेंद्र थोरात यांच्या पॅनल मधून निवडणूक लढवीत आहेत. प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास हे ब्रीद घेऊन समाजातील युवा, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून ते आता तळागाळापर्यंत पोहोचले आहेत.
दर्जात्मक शिक्षण व डिजिटल अध्यापन याकडे त्यांनी विशेष लक्ष दिल आहे. प्रभागातील कोणीच शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे यासाठी त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे. गवळी यांचे समाजाशी असलेल्या समस्यांबाबत नेहमीच पाठपुरावा करण्याचे सातत्य त्यांना यश मिळवून देईल, याबाबत वारंवार नागरिक बोलत आहेत.

