खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक २० मधून भाजपच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांनी युनिक व्हिजन समोर ठेवले आहे.
प्रभाग क्रमांक २० मध्ये कमळ हे चिन्ह घेऊन अनुसूचित जाती महिला ‘अ’ गटातून तृप्ती दीपक कांबळे, अनुसूचित जमाती वर्गातून ‘ब’ गटासाठी सुनील पोपट गवळी, व सर्वसाधारण गटातून योगेंद्र भगवान थोरात हे निवडणूक लढवित आहेत.
यामध्ये भाजपकडून योगेंद्र थोरात यांनी यापूर्वी प्रभाग क्रमांक २० मध्ये कोट्यावधींची विकासकामे केली असल्याने त्यांना मतदारांची मोठी साथ आहे. त्यांनी यापूर्वी एकदा निवडणुक लढवली आणि जिंकली होती. ते सध्या कार्यसम्राट नगरसेवक म्हणून चर्चेत आहेत. ५३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी खेचून आणून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. प्रभागाचा चेहरा मोहरा बदलणारा लोकनेता म्हणून त्यांच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. योगेंद्र थोरात यांचे जनसंपर्कात सातत्य असल्याने त्यांना महापालिकेवर पुन्हा एकदा संधी देण्यासाठी कार्यकर्ते व प्रभागातील मतदारांनी विजयाचा निर्धार केला आहे.
तर तृप्ती कांबळे या अथर्व मल्टीस्टेट अर्बन या उद्योग समूहाच्या चेअरमन आहेत. त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. महिला सक्षमीकरण, आर्थिक दुर्बलता, महिलांच्या रोजगाराच्या दृष्टीकोनातून प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्या स्वतः उच्चशिक्षित असून त्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे वचन जाहीर केले आहे.
यानंतर भाजपकडून निवडणूक लढवत असलेले सुनील गवळी हे अध्यापनाचे काम करतात. त्यांचे व्हिजन स्पष्ट आहे. त्यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारावा, विद्यार्थी वर्ग व प्रभागातील मुलांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
संपूर्ण सांगली- मिरज – कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात शिक्षणाचा उच्च दर्जा, डिजिटल शाळा, विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी स्कूल बस, याशिवाय संगणक कक्ष असे स्मार्ट काम यापूर्वी योगेंद्र थोरात यांनी केले आहे.
प्रभागात स्ट्रीट लाईट, डांबरीकरण, अंतर्गत रस्ते, पाणी आणि आरोग्याचा प्रश्न सोडविण्यात त्यांनी यश मिळवले आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली सध्याचे उमेदवार व पॅनल कार्यरत आहे. ते भरघोस मतांनी विजयी होतील अशी खात्री असल्याचे प्रभागातील ज्येष्ठ जाणकार मंडळींनी सांगितले.

