कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी कुपवाड भागातील प्रभाग एक, दोन आणि आठमधील दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. या तीनही प्रभागांत भाजप, शिंदेसेना, महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, पक्षांनी नाकारलेल्या अनेकांनी अपक्ष अर्ज भरून बंडखोरीचे शस्त्र उपसले आहे. अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली होती.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या पक्षीय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्रमांक एक –
भाजप पॅनल : रवींद्र सदामते, माया गडदे, पद्मश्री पाटील, चेतन सूर्यवंशी.
काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी पॅनल : शेडजी मोहिते, रईसा रंगरेंज, विजय घाडगे, अभियंता सूर्यवंशी, प्रियंका विचारे.
शिंदेसेना पॅनल -अनिल मोहिते, पायल गोसावी, रेश्मा तुपे, संदीप तुपे,
अपक्ष– विश्वजित पाटील,
प्रभाग क्रमांक दोन :
भाजप पॅनल सौ. प्राजक्ता धोतरे, प्रकाश ढंग, मालुश्री खोत, प्रकाश पाटील.
काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार आघाडी पॅनल : सविता मोहिते, अय्याज नायकवडी, प्रेरणा कोळी, समीर मालगावे.
राष्ट्रवादी (अजित पवार) : गजानन मगदूम.
शिंदेसेना : अनिता वनखंडे, सिद्राम दळवाई, शमाबी मुजावर, विनायक यादव.
उद्धवसेना : कासम मुल्ला,
प्रभाग क्रमांक आठ :
भाजप पॅनल :- दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, संजय पाटील.
राष्ट्रवादी (अजित पवार) पॅनल : विष्णू माने, संजय कोलप, .पूनम मोकाशी, प्रियांका देशमुख.
शिंदेसेना : महेश सागरे, जिजाताई लेंगरे, नेत्रा कुरळपकर, स्वप्निल औंधकर, युवराज शिंदे.
समाजवादी पार्टी : नितीन मिरजकर.

