• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गोपनीय हिशेबाच्या डायऱ्या सापडल्या, ७ बड्या व्यावसायिकांवर इन्कम टॅक्सची धाड; ४० गाड्यांतून ९० अधिकाऱ्यांची फौज दाखल.!

Admin by Admin
November 20, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
गोपनीय हिशेबाच्या डायऱ्या सापडल्या, ७ बड्या व्यावसायिकांवर इन्कम टॅक्सची धाड; ४० गाड्यांतून ९० अधिकाऱ्यांची फौज दाखल.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

बुधवारी सूर्योदयाच्या आधीच शहरातील सात बड्या व्यक्तींची घरे, दुकाने अन् व्यावसायांवर आयकर पथकाने धाडी टाकल्या. त्यात सराफ व्यापारी आपटे, त्यांचे व्यावसायिक भागिदार वेणेगुरकर आणि कोळी, हेरिटेजचे मनोज शहा, किमया कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी, सराफ व्यापारी नारायण पेठकर, ॲड.उमेश मराठे यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे जिल्ह्यातील तब्बल ९० आयकर अधिकारी मंगळवारी रात्री कर्नाटकातील विजयपूर येथे मुक्काम केले. पहाटे तीन वाजता तीर्थयात्रेचे स्टीकर्स लावून ४० गाड्यांतून सोलापूरकडे रवाना झाले. सकाळी ६ वाजता सोलापुरात सात जणांशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या. वेगवेगळी शक्कल वापरून शासनाचा कर चुकविणाऱ्या सोलापूर शहरातील काहींची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्याची खात्री करून सर्च वॉरंट घेऊनच अधिकारी संबंधित व्यक्तींच्या दारापर्यंत पोचले. त्यांच्या दिमतीला सोलापूर शहर पोलिस देखील होते. दरम्यान, समोर दिसणाऱ्या व्यावसायाच्या आडून रिअल इस्टेटच्या माध्यमातून कर चोरी केली जाते. काळा पैसा रियल इस्टेट व दागिन्यांमधून कमावला जातो, यामुळे देखील ‘आयकर’कडून छापेमारी केली जाते, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चुकविलेल्या टॅक्सवर २०० टक्के दंड, व्याज लावून टॅक्सची मूळ रक्कम वसूल केली जाते. या पार्श्वभूमीवर संबंधितांचे व्यवहार तपासण्यासाठी सोलापुरात आलेल्या आयकर अधिकाऱ्यांसमवेत सॉफ्टवेअर, आयटी इंजिनिअरही होते. धाडीनंतर या बड्या व्यक्तींनी त्यांच्या ‘सीए’ला बोलावले. पण, आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना तेथे येऊ दिले नाही. संबंधितांचे जबाब, व्यवहाराची चौकशी झाल्यावर अधिकाऱ्यांनी ‘सीए’शी संवाद साधला. धाडीवेळी हिशेबाच्या गोपनीय डायरी, कागदपत्रे देखील अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. टॅक्स चोरीची रक्कम मोठी असल्याने आज (गुरुवारी) पुन्हा चौकशी होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

  • टॅक्स चोरीचा ठपका; आपटेंच्या सर्व आस्थापनांची चौकशी

सोलापुरातील प्रसिद्ध सराफ व्यापारी म्हणून आपटेंची ओळख आहे. ते रिअल इस्टेट व्यावसायातही उतरले आहेत. त्यांच्यासोबत वेणेगुरकर व कोळी हे पार्टनर आहेत. आयकर विभागाने कर चोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या पुण्यातील व सोलापुरातील सर्वच आस्थापनांवर धाडी टाकल्या. अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दूध डेअरी, सोलापुरातील सराफ बाजारातील सोने व चांदीच्या दोन्ही दुकानात अधिकारी ठाण मांडून होते. मागील सात ते आठ वर्षांचे व्यवहार आयकर अधिकाऱ्यांनी तपासले, त्यामुळे सगळेच चिंतेत होते.

ठळक बाबी…

  • तिर्थयात्रेचे स्टिकर लावून विजयपूरवरून निघालेले ९० अधिकारी सहाळी सहा वाजता ३५ गाड्यांमध्ये सोलापुरात दाखल
  • झोपेतून उठण्यापूर्वीच सोलापूर शहरातील सात बड्या व्यक्तींच्या घरी, व्यावसायाच्या ठिकाणी धाडी
  • पहाटे सहा वाजल्यापासून सात जणांच्या आठ वर्षांतील व्यवहारांची तब्बल २० तास चौकशी
  • दुकानात, घरी बाहेरील कोणालाही येऊ दिले नाही, चौकशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग
  • समीर गांधी यांच्या घरात आहे रविवारी विवाह सोहळा; अचानक पडलेल्या धाडीमुळे घरातील सगळेच चिंतेत
  • सात रस्ता परिसरातील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये होती अधिकाऱ्यांच्या मुक्कामाची सोय
  • तब्बल १८ ते २० तास चौकशी, अधिकाऱ्यांनी केले दोनवेळचे जेवण जागेवरच

आयकर विभागाच्या पथकांतील अधिकाऱ्यांनी विजयपूर येथे आदल्यादिवशी मुक्काम केला. तेथील एक स्वतंत्र हॉटेल बुकिंग केले होते. त्यानंतर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास पथके सोलापूरच्या दिशेने रवाना झाली. सोलापुरात आल्यानंतर सकाळी सहा वाजता पथकांनी प्रसिद्ध सराफ व्यापारी आपटे व त्यांचे व्यावसायिक पार्टनर वेणेगुरकर व कोळी यांच्यासह हेरिटेजचे मालक शहा, समीर गांधी, नारायणपेठकर, उमेश मराठे यांच्या घरी धाडी टाकल्या. रात्री ११ वाजले तरी चौकशी सुरुच होती. तब्बल १८ ते २० तासांच्या या चौकशीवेळी पथकातील अधिकाऱ्यांनी दोनवेळचे जेवण जागेवरच केले.

Previous Post

सांगली पोलिसांनी ३०६ आरोपींना दिला सज्जड दम, जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती : नागरिकांनी थेट तक्रार करण्याचे आवाहन..!

Next Post

कुपवाडमध्ये आजपासून कीर्तन महोत्सव सोहळा,शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन,गजानन मगदुम यांची माहिती.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमध्ये आजपासून कीर्तन महोत्सव सोहळा,शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन,गजानन मगदुम यांची माहिती.!

कुपवाडमध्ये आजपासून कीर्तन महोत्सव सोहळा,शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन,गजानन मगदुम यांची माहिती.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group