कुपवाडमध्ये आजपासून कीर्तन महोत्सव सोहळा,शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन,गजानन मगदुम यांची माहिती.!
कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कुपवाडमधील शिवप्रेमी कला, क्रीडा – सांस्कृतिक मंडळ व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समिती गावभाग यांच्यावतीने यावर्षीही आज गुरुवार दिनांक २० ते शनिवारी २२ नोव्हेंबर या तीन दिवसीय कालावधीत शहरातील अकुज ड्रीमलँडच्या भव्य मैदानावर ‘गजर कीर्तनाचा…सोहळा विठ्ठल भक्तांचा’ या अंतर्गत तीन दिवसीय भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजक माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी दिली.

श्री.मगदूम म्हणाले, किर्तन महोत्सव सोहळ्याचे यंदा १३ वे वर्ष असून यापूर्वी झालेल्या कीर्तन महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर, बंडातात्या कराडकर, ज्ञानेश्वर माऊली चाळक, चैतन्य महाराज वाडेकर, भगवतीताई सातारकर, प्रकाश साठे महाराज, शिवलीला पाटील, कृष्णामहाराज चाळक, चैतन्य महाराज सातारकर यांसह अनेक नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
यंदा २० ते २२ नोव्हेंबर अशा तीन दिवसांच्या कालावधीत पहिल्या दिवशी गुरुवारी २० रोजी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प प्रकाश साठे महाराज (बीड), दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २१ रोजी महिला कीर्तनकार ह.भ.प शिवलीलाताई पाटील (बार्शी) व शनिवारी २२ रोजी ह.भ.प भरत (बाळासाहेब) शिंदे महाराज कांबळेश्वर (बारामती ) अशा राज्य पातळीवर गाजलेल्या प्रसिध्द कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली आहेत. कुपवाडमधील अकुज ड्रीमलॅंडच्या मैदानावर दररोज रात्री ०७ ते १० या वेळेत कीर्तने सादर होतील. त्याअगोदर सायंकाळी ०५ ते ०७ यावेळेत दोन तास हरिपाठाचा कार्यक्रम होईल. शनिवारी भरत शिंदे महाराज यांच्या कीर्तन समाप्तीनंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मैदानावर आकर्षक विद्युत रोषणाई, महिला-पुरुषांची स्वतंत्र भव्य बैठक व ध्वनी व्यवस्थेची सुविधा आहे. या भव्य कीर्तन सोहळ्यासाठी समस्त कुपवाडकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक गजानन मगदूम यांसह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समितीतर्फे करण्यात आले आहे.
संयोजन समितीचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील, गंगाधर पाटील, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, हणमंत सरगर, दादासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, विजयकुमार खोत, अरुण रुपनर, कल्लाप्पा कोरे, भाऊसाहेब पाटील, नितीन कारंडे, योगेश हिंगमिरे, योगेश तोडकर, अभिजीत परीट यासह शिवप्रेमी मंडळाचे कार्यकर्ते करीत आहेत.