सांगली पोलिसांनी ३०६ आरोपींना दिला सज्जड दम, जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती : नागरिकांनी थेट तक्रार करण्याचे आवाहन..!

IMG-20251119-WA2962(1)

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जिल्ह्यातील गुन्हेगारांवर अंकुश रहावा तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी महत्वाच्या गंभीर
गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींचा आदान प्रदान कार्यक्रम बुधवारी पोलीस मुख्यालय, सांगली येथे राबविण्यात आला होता. यावेळेस गुन्हेगारांचा कोणाला त्रास होत असल्यास थेट तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सक्त सूचना देऊन, मागील ०५ वर्षामध्ये २ किंवा २ पेक्षा जास्त शरीराविरुध्द गंभीर गुन्हे ( खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत ) तसेच मोका जामीनावर सुटलेले, तडीपार कालावधी संपलेले, अंमली पदार्थ कायद्यांतर्गत व शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपींची आदान प्रदान मोहीम आयोजित केली होती.

आदान प्रदान करीता हजर असलेल्या आरोपींची संपुर्ण माहिती घेऊन त्यांच्याकडून माहितीचा फॉर्म (इंटरोगेशन फॉर्म) भरून घेऊन ते सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजिवीकेची साधने काय, त्यांचे मित्र कोण आहेत, सध्या कोठे व कोणासोबत काम करतात, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर, पत्ते इ. बाबत इंत्यभुत माहिती अद्ययावत करण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हेगारांवर व त्यांच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यास सांगितले. आरोपींनी भविष्यात कोणताही गुन्हा करू नये, गुन्हेगारी कृत्यात सहभाग घेवू नये याबाबत कडक शब्दात सज्जड दम दिला.

शस्त्र अधिनियम व खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अशा गुन्ह्यात पुन्हा सहभाग आढळल्यास त्यांच्याविरुद्ध प्रभावी कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. तसेच सध्या जामीनावर बाहेर असलेल्या आरोपींना डी. बी. पथक, बीट मार्शल यांनी वारंवार चेक करून ते सध्या काय करतात यावर लक्ष ठेवण्यास सांगितल्याने गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले.

गुन्हेगारी वर्तनात सुधारणा होते की नाही, याबाबत पडताळणी करण्याबाबत पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या असल्याचे पोलिस अधीक्षकांकडून सांगण्यात आले. ज्यांच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५, ५६, ५७ प्रमाणे तडीपारीची कारवाई करणेबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देवुन एम.पी. डी. ए., मोका अन्वये कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. यापुढे गुन्हयातील आरोपींवर पोलीस प्रशासनाकडुन बारीक लक्ष ठेवले जाणार असल्याने आरोपींना त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीत सुधारणा करणेचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला.

सदर आदान प्रदान कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यासह पोलीस ठाण्यातील डी. बी. पथकाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते. यावेळी मोका, खुन, खुनाचा प्रयत्न, अंमली पदार्थ, शस्त्र अधिनिमय, तडीपारी पुर्ण झालेले अशा गंभीर गुन्ह्यातील एकुण ३०६ आरोपींना हजर करण्यात आले होते. ही मोहीम यापुढेही राबविण्यात येणार असून रेकॉर्डवरील आरोपींवर बारीक निगराणी ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हा पोलीस दलाकडून सांगण्यात आले.

You may have missed

error: Content is protected !!