• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | जत नगरपरिषद निवडणुकीत जनसुराज्यचा भाजपाला जाहीर पाठींबा..!

Admin by Admin
November 19, 2025
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | जत नगरपरिषद निवडणुकीत जनसुराज्यचा भाजपाला जाहीर पाठींबा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जत नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जनसुराज्य शक्ती पक्षाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जत नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. रविंद्र आरळी तसेच संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलला अधिकृत पाठींबा देण्याची घोषणा जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.

या निर्णयामुळे जत नगरपरिषदेत सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन उभे राहील, असा विश्वास बसवराज पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा दृढनिश्चयही यावेळी व्यक्त करण्यात आला.

जतच्या जनतेने विकासाच्या प्रवासात भाजप-जनसुराज्य यांच्या संयुक्त पॅनेलला मोठ्या संख्येने साथ द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या पाठींबा घोषणेपूर्वी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज चिदानंद पाटील यांनी मा. आमदार गोपीचंद पडळकर यांची सदिच्छा भेट घेऊन जत नगरपरिषद निवडणुकीत भाजप पॅनेलला पाठींबा जाहीर केला.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार डॉ. विनय कोरे सावकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून या निर्णयाचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी जत नगरपरिषद विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी सरदार पाटील, सुनिल पवार, डॉ.सार्थक हिट्टी, रविंद्र शेगावे, चंद्रकांत गुड्डोडगी, सौ.श्रुती हिट्टी यांच्या सह भाजपा-जनसुराज्य पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

बनाळीतील डॉ.कोडग व सहकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम.! भाजपमध्ये प्रवेश, यंत्रणा कामाला लावणार – सुनील पवार

Next Post

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group