जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जत तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दिवसेंदिवस निवडणुकीचे रणांगण तापत आहे. तालुक्यातील बनाळी जि.प गटातील आवंढी येथील माजी उपसरपंच डॉ. प्रदीप कोडग,सतीश कोडग, यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी पं.स. सदस्य सुनील पवार व आ. पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी जि.प.सभापती सुनिलभैय्या पवार, माजी जि.प.सदस्य सरदार पाटील, मिलिंदबापु पाटील, प्रकाशमामा ईंगवले,भारत महाराज कोडग ,माजी चेअरमन माणिकदादा पाटील, महादेव मरगळे, माजी उपसरपंच संजय एडगे, मोहन कोडग, ग्रा.पं.उपसरपंच अमोल पाटील, ग्रा.पं.सदस्य राजुदादा कोडग, युवा नेते सागरदादा मरगळे, पांडुरंग सोळगे, शहाजीबापु कोडग, युवराज काशीद, अतुल पाटील, प्रदिप कोडग उपस्थित होते. तर आ. पडळकर यांच्या उपस्थितीत माजी उपसरपंच डॉ.प्रदिपदादा कोडग, नेते महादेव गोरख कोडग, माजी ग्रा.पं.सदस्य सतिशभाऊ कोडग, महादेव आकाराम कोडग, सचिन नानासो कोडग, जेष्ठ नेते दत्तात्रय एडगे, दत्तात्रय कोडग यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा झटका मानला जात आहे.
यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार म्हणाले की, डॉ. प्रदीप कोडग यांच्यासह इतरांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.
जतचे आ. गोपीचंद पडळकर यांनी तालुक्यात केलेल्या विकासकामामुळे कोडग व सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून येणाऱ्या काळात आणखी काहीजण भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांनी गोपनीय खबऱ्या‘ शी बोलताना सांगितले.

