• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

म्हैसाळ विस्तारीत योजनेला आणि जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेला निधी शिवसेनेमुळेच- संजय विभुते

'पोरगं एकाला झालं म्हणून पेढे वाटायचे दुसऱ्याने' विभुतेंचा भाजपला खोचक टोला..!

Admin by Admin
November 2, 2025
in राजकीय
1 min read
0
म्हैसाळ विस्तारीत योजनेला आणि जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेला निधी शिवसेनेमुळेच- संजय विभुते
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जत तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ विस्तार योजनेसाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना दोन हजार कोटीचा निधी दिला. तसेच जत शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणारी ७८ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना शिवसेनेमुळे मंजुर झाली आहे. जत तालुक्यातील सर्व विकास कामे ही शिवसेनेमुळे झाली आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ‘पोरगं एकाला झालं म्हणून पेढे वाटायचे दुसऱ्याने’ असा खोचक टोला शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी भाजपला लगावत आता पर्यंत तालुक्याला शिवसेनेमुळे निधी मिळाल्याचा गौप्यस्फोट पत्रकार परिषदेत केला. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटात मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश होवाळे, प्रवीण अवरादी, सचिन मदने, मिलिंद टोणे , विजय दोरकर, दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते. नूतन जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे प्रामाणिक काम केले होते. त्याची परतफेड करण्याची वेळ आता भाजपवर आली आहे. राज्यात भाजप हा शिवसेनेचा मोठा भाऊ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीचा प्रस्ताव भाजपकडुन अद्यापही आला नाही. शिवसेनेची ताकद सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. जर भाजपने युतीमध्ये सन्मानपूर्वक जागा न सोडल्यास शिवसेना स्वतंत्र लढण्यास तयार आहे. विकासाचा दृष्टिकोन शिवसेनेने नेहमीच ठेवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्याला भरभरून निधी दिला आहे. त्यामुळे जत नगर परिषद , जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले.

Previous Post

महायुतीतून बिळुरची जागा जनसुराज्यला द्या, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार मागणी..!

Next Post

उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल, मी स्वत: जाऊन…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल, मी स्वत: जाऊन…

उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल, मी स्वत: जाऊन…

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group