गोपनीय खबऱ्या | जत प्रतिनिधी
भाजपाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जत तालुकाध्यक्ष सद्दाम अत्तार व युवा नेते अशोक कोळी यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले. यावेळी बाजार समितीचे सभापती शिंदे, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.युवराज निकम, अशोक बन्नेंनवर ,माजी बांधकाम सभापती नामदेव काळे ,भूपेंद्र कांबळे , शहराध्यक्ष निलेश बामणे, माजी नगरसेवक मुन्ना पकाली ,परशुराम वास्टर ,प्रशांत वास्टर, माजी नगरसेवक महादेव कोळी,विकास माने ,बाळासाहेब तंगडी,रफीक कुरुंदवाड, विशाल कांबळे, प्रदीप नागणे, आदिजण उपस्थित होते.
दोन माजी नगरसेविका काँग्रेसच्या वाटेवर.?
प्रभाग क्रमांक सहा मधून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या जयश्री ताई शिंदे ह्या काँग्रेसचे वाटेवर असून त्यांचे पती आप्पा शिंदे व त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार विक्रम सावंत यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच त्यांचाही पक्षप्रवेश होणार असून आणखी एक भाजपच्या माजी नगरसेविका पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. एकंदरीत ऐन दिवाळीत भाजपला तीन धक्के बसले आहेत.

