• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | पडळकरांनी धुराडं पेटू देणार नाही, असा इशारा दिलेल्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं नाव रात्रीत बदललं; नवा वाद पेटण्याची शक्यता.?

Admin by Admin
October 24, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | पडळकरांनी धुराडं पेटू देणार नाही, असा इशारा दिलेल्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं नाव रात्रीत बदललं; नवा वाद पेटण्याची शक्यता.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीतील जत येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर असलेले राजारामबापू पाटील नावाच्या ऐवजी ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ अशा नावाचा फलक लावण्यात आला आहे.

या घटनेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना टार्गेट करून टीका करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी जतमधील साखर कारखान्यावरून जयंत पाटील यांना डिवचलं होतं.

‘तुम्हाला जतची इतकी चिंता आणि काळजी आहे तर मग जतच साखर कारखाना सभासदांना देऊन टाका. नाही तर मी जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनीट क्रमांक चारचे धुराडे पेटू देणार नाही, मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे, असा इशारा पडळकर यांनी दिला होता.

अशातच आता पडळकरांनी इशारा दिल्यानंतर काल रात्री या साखर कारखान्याचे नाव बदलल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा फलकावर रात्रीत ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असं नाव कोणी लिहिलं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना असून हा सभासदांचा कारखाना असून तो पुन्हा सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, अशी भूमिका पडळकरांनी घेतली आहे.

शिवाय हा कारखाना सभासदांना परत केल्याशिवाय तो सुरू होऊ देणार नसल्याचा इशाराही पडळकरांनी दिला आहे. त्यामुळे आता कारखान्याच्या फलकावरील नाव कोणी बदललं हे अद्याप समोर आलं नसलं तरी या नाव बदलल्याच्या मुद्द्यावर पडळकर आणि पाटील या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Previous Post

भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जत तालुकाध्यक्ष सद्दाम अत्तार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next Post

सांगली पोलिसांचा नादच खुळा.! ७२ तासांत अपहरण झालेल्या बालकाला सुखरूप आईकडे दिले, एकजण अटक तर दोघे फरार..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली पोलिसांचा नादच खुळा.! ७२ तासांत अपहरण झालेल्या बालकाला सुखरूप आईकडे दिले, एकजण अटक तर दोघे फरार..!

सांगली पोलिसांचा नादच खुळा.! ७२ तासांत अपहरण झालेल्या बालकाला सुखरूप आईकडे दिले, एकजण अटक तर दोघे फरार..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group