• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ

Admin by Admin
October 13, 2025
in सामाजिक
1 min read
0
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

राज्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आली आहे. हा रुग्ण सौदी अरेबियातून धुळ्यात आला.

त्वचेसंबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने धुळे शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे या रुग्णाच्या तीन रक्त चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या अहवालातून त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण २ ऑक्टोबर २०२५ रोजी सौदी अरेबियातून धुळ्यात आला. मात्र, त्यानतंर त्वचेसंबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील एनआयए प्रयोगशाळेने या चाचण्यांचा अहवाल दिल्यानंतर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

हा आजार सुरुवातीला आफ्रिकेतून पसरला, पण तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. कोणत्याही आजाराबाबत भीती न बाळगता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे यांसारखी लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Previous Post

मिरजेतील प्रभाग चार मधील ३ कोटी ३० लाखांच्या कामांचा मोठा प्रारंभ..!

Next Post

‘मविआ’साठी तीन कट्टर विरोधक नेत्यांचा पुढाकार; सांगलीतील नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक, ‘बिग प्लॅन’ ठरला?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

'मविआ'साठी तीन कट्टर विरोधक नेत्यांचा पुढाकार; सांगलीतील नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक, 'बिग प्लॅन' ठरला?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group