खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ.सुरेश खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकासकामांचा धडाका सुरु केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये अण्णाभाऊ साठे योजना, नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांच्या २१ विकासकामांचा शुभारंभ आ. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला होता. आज सलग दुसऱ्या दिवशी आ. खाडे यांनी हा धडाका सुरु ठेवला असून आज प्रभाग चार मध्ये तब्बल ३ कोटी ३० लाख रुपयांच्या २१ विकासकामांचे उद्घाटन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याच प्रभागातील अन्य चौदा कामांसाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरु होणार आहेत. प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आ.खाडे यांनी आश्वासनाची पूर्तता केली असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
सोमवारी प्रभाग चार मध्ये संपन्न झालेल्या विकासकामांच्या शुभारंभामध्ये कानडे प्लॉट, गजराज कॉलनी, सिद्धिगणेश पार्क, यशवंत पार्क, पूर्व दत्त कॉलनी, खोत नगर,पद्मावती पार्क, अंबाई कॉलनी, इंदिरानगर वसाहत, ब्राह्मणपुरी आर.एम. हायस्कुल बोळ, कन्या शाळा बोळ, गजानन कॉलनी टाकळी रोड, सत्यसाई पार्क, सावंत प्लॉट पवनचक्की, पश्चिम दत्त कॉलनी या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण, रस्ते सुधारणा या कामांसह रेणुकादेवी मंदिर सभामंडप बांधकाम करणे, सिद्धिगणेश पार्क ओपन स्पेस मध्ये सांस्कृतिक हॉल बांधणे, इंदिरानगर येथे अंगणवाडी बांधकाम करणे, इंदिरानगर भागात सोयीसुविधा करणे, पद्मावती पार्कमध्ये मनपाचा खुला भूखंड विकसित करणे, दिंडीवेस विठ्ठल मंदिर मोकळ्या जागेत सभामंडप करणे या कामांचा समावेश असून या सर्व कामांसाठी ३ कोटी ३० लाख रुपये खर्च होणार आहेत.
या सर्व कामांचा शुभारंभ आ.सुरेश खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी युवा नेते सुशांत खाडे, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे, भाजप नेते सुरेश आवटी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, दिगंबर जाधव, निरंजन आवटी, संदीप आवटी, शशिकांत वाघमोडे, भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर, सचिन पिसे, अमित पिसे, राकेश शिंदे, अभिजित रजपूत, सचिन जाधव, सौ. संगीता खोत, अजिंक्य हंबर, अमित कांबळे, राजेंद्र नातू, महेश फोंडे, मनीष देशपांडे, मिलिंद भिडे, श्रीकृष्ण कुलकर्णी, विवेक शेटे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.