• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

Admin by Admin
September 24, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

महापालिकेतील ठाणेदारांना दणका दिल्यानंतर आता आयुक्त सत्यम गांधी यांनी कामचुकार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. मंगळवारी प्रभारी उद्यान अधीक्षक डॉ. रवींद्र ताटे यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले.

तर नगररचना विभागाकडील कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आयुक्तांच्या कारवाईने महापालिकेत खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थान विभागाचा पदभार डाॅ. ताटे यांच्याकडे होता. त्याकाळात त्यांनी दैनंदिन स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केले नाही म्हणून त्यांची घनकचरा विभागातून उचलबांगडी करण्यात आली. सध्या त्यांच्याकडे मुख्य उद्यान अधीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

उद्यान विभागाकडील देखभालीच्या अनुषंगाने दैनंदिन फिरती करून उद्यान देखभाल दुरुस्ती व दैनंदिन कामकाजाबाबतचे फोटो ग्रुपवर शेअर करणे व झाडांचे मंथन करणेबाबत सूचना देऊनही डॉ. ताटे यांच्याकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. यावरून त्यांचे कामकाज असमाधानकारक असून त्यांच्यावर सोपवलेल्या पदाची जबाबदारी, कार्य कर्तव्य ते सक्षमपणे पार पाडत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला.

त्यांची वर्तणूक गंभीर स्वरुपाची, नियमबाह्य व शिस्त भंगाची असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार ते कारवाईस पात्र असल्याने त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचे आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी दैनंदिन पाहणी करून अशा बांधकामावर दंडात्मक कारवाई करावी. ही बांधकामे नियमित करावीत. याबाबतचे दैनंदिन उद्दिष्ट देत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगररचना विभागाकडील शाखा अभियंत्यांना आयुक्तांनी दिला होता.

शिस्तभंगाची कारवाईबाबत कारणे दाखवा

आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा अभियंत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला. यात कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील कोरे वगळता अन्य अभियंता मानधन तत्वावर पालिकेच्या सेवेत आहेत. महापालिकेचे प्रभारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Previous Post

माधवनगर ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवडा अभियान विशेष शिबिर

Next Post

अतिवृष्टीमुळे तासगावातील कार्यकर्ता संवाद मेळावा स्थगित

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अतिवृष्टीमुळे तासगावातील कार्यकर्ता संवाद मेळावा स्थगित

अतिवृष्टीमुळे तासगावातील कार्यकर्ता संवाद मेळावा स्थगित

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group