सामान्य जनतेला अधिकाधिक सुविधा देण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सांगली अप्पर तहसील कार्यालया अंतर्गत माधवनगर ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवडा अभियान राबवण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती मंडळ अधिकारी भरत काळे कुपवाड व ग्राम महसूल अधिकारी सौ.सुनिता शिंदे माधवनगर यांनी दिली.
महसूल प्रशासन लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक होण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपक्रम राबविले जातात. याचा अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरावडा साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आज माधवनगर येथे पाणंद शिवार फेरी व अतिक्रमणित रस्त्याची पाहणी करण्यात आली.
यावेळी मंडळ अधिकारी भरत काळे, कुपवाड, माधवनगर गावच्या सरपंच अंजू तोरो, ग्राम महसूल अधिकारी सुनिता शिंदे, शंकर पाटील, माणिक पाटील, दत्तात्रय पाटील, विठ्ठल पाटील, अतुल पाटील, सुनील पाटील सदाशिव पाटील, रघुनाथ पाटील, संतोष पाटील तसेच गावातील इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते.