• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

निरंजन आवटींचे आयुक्तांना निवेदन.! म्हणाले,गणेशोत्सवाच्या आधी ‘हे’ करा..

Admin by Admin
August 8, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
निरंजन आवटींचे आयुक्तांना निवेदन.! म्हणाले,गणेशोत्सवाच्या आधी ‘हे’ करा..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून, मिरजेतील रस्ते व लाईट यांची व्यवस्था महापालिकेने प्राधान्याने आणि नीटनेटकी करावी, अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात आवटी यांनी नमूद केले की, मिरजेत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सुविधा देण्याबाबत महापालिकेने गंभीरतेने लक्ष घालावे. मंडळांकडून मंडप उभारणीसाठी खड्डे काढले जातात, त्यासंदर्भात घेतली जाणारी रक्कम व फीमध्ये सवलत देण्यात यावी. मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्क काँक्रीट पद्धतीने करावे, मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, गणेश तलाव स्वच्छ करावा तसेच गणेश तलाव व कृष्णा घाट येथे मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करावी. गणेशोत्सव काळात महिलांसाठी टॉयलेटची सुविधा उपलब्ध करावी. न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील जागेचे संपादन करावे. मिरजेतील श्री महालक्ष्मी मूर्ती आणि छत्रपती शाहू महाराज स्मारक सुशोभित करावे, अशा मागण्या आवटी यांनी निवेदनात नमूद केल्या आहेत.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | वैष्णोदेवीचे दागिने चोरी; आमणापूरच्या मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

Next Post

मिरजेत राष्ट्रवादीच्या महिला भगिनींनी पाठवल्या सीमेवरील जवानांना राख्या..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत राष्ट्रवादीच्या महिला भगिनींनी पाठवल्या सीमेवरील जवानांना राख्या..!

मिरजेत राष्ट्रवादीच्या महिला भगिनींनी पाठवल्या सीमेवरील जवानांना राख्या..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group