• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग | उद्या ‘भारत बंद’ची हाक

Admin by Admin
July 8, 2025
in सामाजिक
1 min read
0
बिग ब्रेकिंग | उद्या ‘भारत बंद’ची हाक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दहा संघटनांचा सहभाग; २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार, काय सुरु? काय बंद?

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिलेली आहे. उद्या भारत बंदची घोषणा करण्यात आलेली आहे. कामगार आणि शेतकरी संघटना भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारची मजूर, कामगारविरोधी धोरणं, शेतकऱ्यांच्या विरोधातील आणि कॉर्पोरेट्सची तळी उचलणारी धोरणं याविरोधात ९ जुलैला ‘भारत बंद’ची हाक देण्यात आलेली आहे. सरकारकडून आर्थिक आणि कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे मजुरांचं अधिकार आणखी मर्यादित होतील. व्यापार करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या नावाखाली सरकार सर्वसामान्यांना नाडत असल्याचा आरोप संघटनांचा आहे.

उद्या होणाऱ्या बंदमध्ये देशभरातील २५ कोटी कामगारांचा सहभाग असेल. बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम यांच्यासह विविध क्षेत्रातील कामगार बंदमध्ये सहभागी होणार आहेत. २५ कोटी कामगार बंदमध्ये सहभागी होणार असल्यानं देशातील महत्त्वाच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. १० प्रमुख देशव्यापी कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिलेली आहे. त्यासोबत या संघटनांच्या संबंधित अन्य कामगार संघटनादेखील बंदमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. केंद्र सरकार कामगार, शेतकरी विरोधी धोरणं राबवत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. सरकारी धोरणांचा लाभ केवळ उद्योगपती आणि त्यांच्या व्यवसायांनाच होत असल्याचा संघटनांचा दावा आहे.

भारत बंदमध्ये कोणकोणत्या संघटनांचा सहभाग?

१. अखिल भारतीय ट्रेड यूनियन काँग्रेस
२. भारतीय राष्ट्रीय ट्रेड यूनियन काँग्रेस
३. भारतीय ट्रेड यूनियनचे केंद्र
४. हिंदू मजदूर सभा
५. स्वनियोजित महिला संघ
६. लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन
७. युनायटेड ट्रेड यूनियन काँग्रेस

या संघटनांचा बंदला पाठिंबा

१. संयुक्त किसान मोर्चा
२. ग्रामीण कर्मचारी संघ
३. रेल्वे, एनएमडीसी लिमिटेड आणि स्टील उद्योगातील सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी

उद्या कोणत्या सेवा बंद?
१. बँकिग सेवा
२. विमा कंपन्यांच्या सेवा
३. पोस्ट ऑफिस
४. कोळसा खाणींचं काम
५. राज्य वाहतूक सेवा (सरकारी बस)
६. महामार्ग आणि रस्ते बांधकाम
७. सरकारी कारखाने आणि कंपन्यांचं उत्पादन

काय सुरु राहणार?
१. खासगी क्षेत्रातील बहुतेक कंपन्या
२. रुग्णालयं, वैद्यकीय आपत्कालीन सेवा
३. खासगी शाळा, महाविद्यालयं, ऑनलाईन सेवा

Previous Post

मोठी ब्रेकिंग | मी स्वतः मीरा-भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यास निघतोय, हिंमत असेल तर अडवा, मंत्री सरनाईकांचं पोलिसांना आव्हान!

Next Post

राज्यातील कुख्यात गुंडाचा भीषण अंत 

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज्यातील कुख्यात गुंडाचा भीषण अंत 

राज्यातील कुख्यात गुंडाचा भीषण अंत 

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group