• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक ब्रेकिंग ! ‘नशाबाजाराची साखळी सांगली- मिरजेतून’.? इंजेक्शन व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी..!

Admin by Admin
July 7, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
धक्कादायक ब्रेकिंग ! ‘नशाबाजाराची साखळी सांगली- मिरजेतून’.? इंजेक्शन व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कोल्हापूर जिल्ह्यात नशेचे इंजेक्शन पुरवठा केल्याप्रकरणी सांगलीतील काही जण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय इंजेक्शन दिले असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे नशाबाजाराची साखळी सांगलीतून चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘नशामुक्त सांगली’साठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उघडलेल्या प्रशासकीय मोहिमेसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे.

कोल्हापूर येथे सोहिल मोहिते या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यात तो गांजा आणि नशेचे इंजेक्शन विकत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या साखळीला धक्का देत त्याला इंजेक्शन पुरवठा करणाऱ्या कसबा बावडा येथील रोहन चव्हाण याला अटक केली. त्याने इचलकरंजीतील शहापूर येथील मेडिकल दुकान चालवणाऱ्या एका तरुणाकडून इंजेक्शन घेतल्याची कबुली दिली. त्या माहितीवरून अजय डुबल याला अटक करण्यात आली. त्याने ही इंजेक्शन सांगलीतून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी तपासाची दिशा सांगलीकडे वळवली आहे. आता पोलिस तपासातील सांगलीतील साखळी अशाच पद्धतीने उघड पाडली जाते का, याकडे लक्ष असणार आहे.

नशेच्या इंजेक्शनचा जो ‘बाजार’ होतोय, त्याकडे अन्न-औषध विभागाचे दुर्लक्ष आहे की तिथंपर्यंत यंत्रणा पोहोचत नाही, असा मुख्य प्रश्न आहे. औषध विक्री दुकानामध्ये अशा स्वरुपाचे इंजेक्शन विकताना नोंदणी ठेवणे, रुग्णाच्या नावाची नोंद करणे, त्याला ज्या डॉक्टरांनी चिठ्ठी दिली आहे, त्याची नोंद करणे आवश्यक आहे. काही औषधांच्या बाबतीत चिठ्ठीवर ‘औषध दिले’, असा शिक्का मारणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्याच चिठ्ठीच्या आधारे पुन्हा औषध दिले जात नाही. इतके सगळे कडक निर्देश असताना हा बाजार चालतो कसा, हे कोडे आहे.

संग्रहित छायाचित्र
Previous Post

ब्रेकिंग! ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर शिंदे गटात हालचाली

Next Post

भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात भावजय प्रिया फुकेंची विधान भवनावर धडक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात भावजय प्रिया फुकेंची विधान भवनावर धडक

भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात भावजय प्रिया फुकेंची विधान भवनावर धडक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group