• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात भावजय प्रिया फुकेंची विधान भवनावर धडक

Admin by Admin
July 8, 2025
in क्राईम, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
भाजप आमदार परिणय फुकेंविरोधात भावजय प्रिया फुकेंची विधान भवनावर धडक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनी मुलांसह आज विधान भवनावर धडक दिली. गेल्या एक वर्षापासून भेट मागूनही मुख्यमंत्री भेटत नाहीत आणि फुकेंसारख्या व्यक्तीला पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत प्रिया यांनी निदर्शने केली.आक्रमक झालेल्या प्रिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

परिणय फुके यांचे भाऊ संकेत फुके यांच्याशी लग्न करताना फसवणूक झाल्याचा प्रिया यांचा आरोप आहे. संकेत यांचे किडनी प्रत्यारोपण झाले होते, पण त्याची माहिती लग्नापूर्वी दिली गेली नाही. ते आपल्याला समजल्यानंतर आपण फुके कुटुंबीयांना विचारणा केली असता त्यांनी जिवाला धोका होईल, अशी धमकी दिली. त्यानंतर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात येत आहे, असे प्रिया फुके यांचे म्हणणे आहे.

प्रिया फुके यांनी न्यायासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या प्रिया यांनी आज विधान भवन गाठले. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही होती. या वेळी प्रिया यांनी पर्समधून काही कागदपत्रे बाहेर काढून प्रसारमाध्यमांना दाखवण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिसांनी त्यांच्याकडून ती खेचून घेतली. त्यानंतर प्रिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि व्हॅनमध्ये बसवून घेऊन गेले.

Previous Post

धक्कादायक ब्रेकिंग ! ‘नशाबाजाराची साखळी सांगली- मिरजेतून’.? इंजेक्शन व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी..!

Next Post

मोठी ब्रेकिंग | मी स्वतः मीरा-भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यास निघतोय, हिंमत असेल तर अडवा, मंत्री सरनाईकांचं पोलिसांना आव्हान!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | मी स्वतः मीरा-भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यास निघतोय, हिंमत असेल तर अडवा, मंत्री सरनाईकांचं पोलिसांना आव्हान!

मोठी ब्रेकिंग | मी स्वतः मीरा-भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यास निघतोय, हिंमत असेल तर अडवा, मंत्री सरनाईकांचं पोलिसांना आव्हान!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group