• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इचलकरंजीतील सोशल को. ऑप. क्रेडीट सोसायटीवर प्रशासक : संचालक मंडळ ५ वर्षासाठी अपात्र

Admin by Admin
June 28, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इचलकरंजीतील सोशल को. ऑप. क्रेडीट सोसायटीवर प्रशासक : संचालक मंडळ ५ वर्षासाठी अपात्र
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

इचलकरंजी येथील दि सोशल को. ऑप. लि., इचलकरंजी या संस्थेच्या कामकाजात गंभीर बाबी निदर्शनास आल्याने संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक म्हणून गणेश विश्वास कुमठेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहकारी संस्था हातकणंगले उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिलेले आहेत.

या आदेशाविरुध्द विद्यमान संचालक यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्याकडे अपिल केलेली होती. या अपिलकामी दोन्ही बाजूचे लेखी व तोंडी युक्तीवाद ग्राह्य मानून विभागीय सहनिबंधक संस्था कोल्हापूर डॉ. महेश कदम यांनी अपिलंट यांनी केलेली अपिल नामंजूर करून हातकणंगले उपनिबंधक डॉ. एस.एन. जाधव यांचा आदेश कायम ठेवणेत आला आहे. याबाबती माहिती सोशल बचाव कृती समितीच्यावतीने पत्रकाद्वारे देण्यात आली.

संस्थेच्या गैरकारभारास कंटाळून दि सोशल सोसायटीच्या संचालकांनी दि सोशल बचाव कृती समितीच्या माध्यमातून राजीनामा दिला होता. तसेच सन २०२३-२४ सालातील लेखापरिक्षण अहवाल उपनिबंधक यांचेकडे मुदतपूर्व सादर केला नव्हता. यासह संस्थेच्या अन्य कामकाजात गंभीर वित्तीय बाबी उपनिबंधक यांच्याकडे निदर्शनास आल्या. यामुळे त्यांनी प्रशासक नियुक्त करुन संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ बरखास्त करून पुढील ५ वर्षाकरिता अपात्र केले. तसेच प्रशासक यांनी संस्थेच्या समितीची निवडणूक प्रक्रिया ६ महिन्याच्या आत राबवून नविन पदभार सोपवावा, असे आदेश दिलेला आहे.

Previous Post

मोठा भ्रष्टाचार : दररोज २६ हजार रुपये खिशात घातल्याचे कागदोपत्री स्पष्ट,५ वर्षात कोट्यावधीचा भ्रष्टाचार –पृथ्वीराजसिंह यादव

Next Post

आरगेतील माळी कुटुंबाला आमदार खाडे यांच्या प्रयत्नातून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आरगेतील माळी कुटुंबाला आमदार खाडे यांच्या प्रयत्नातून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत

आरगेतील माळी कुटुंबाला आमदार खाडे यांच्या प्रयत्नातून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group