• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडात खळबळ ! २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून..!

Admin by Admin
June 28, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाडात खळबळ ! २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कुपवाड शहरातील बजरंगनगर येथे तरुणाचा धारदार हत्याराने वार करत खून निर्घृण खून करण्यात आला. उमेश मच्छिंद्र पाटील (वय २०, रा. कुपवाड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

काल रात्री सव्वाअकराच्या सुमारास झालेल्या या खुनामुळे शहरात खळबळ उडाली. शहरात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या खुनाच्या घटनेमुळे शहर हादरले.

दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. कुपवाड औद्योगिक पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा सुरू होता. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुपवाड परिसरातील बजरंगनगर येथे उमेश पाटील याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कुपवाड औद्योगिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाटील याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आला. धारदार शस्त्राने हल्ला केल्याने घटनास्थळाचे चित्र विदारक होते. दरम्यान, ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झालेले नाही. कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखली पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

मिरज | गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी यंत्रणा कामाला, मिरज उपविभागात २० हद्दपारीचे प्रस्ताव..!

Next Post

अखेर BJP चा नवा अध्यक्ष ठरला; १ जुलैला होणार मोठी घोषणा!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अखेर BJP चा नवा अध्यक्ष ठरला; १ जुलैला होणार मोठी घोषणा!

अखेर BJP चा नवा अध्यक्ष ठरला; १ जुलैला होणार मोठी घोषणा!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group