• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी यंत्रणा कामाला, मिरज उपविभागात २० हद्दपारीचे प्रस्ताव..!

Admin by Admin
June 28, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज | गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी यंत्रणा कामाला, मिरज उपविभागात २० हद्दपारीचे प्रस्ताव..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीच्या कारवाईसाठी महापालिका क्षेत्रातील पोलीस ठाण्यांची यंत्रणा कामाला लागली आहे. मिरज उपविभागीय अधिकारी/ प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे तडीपारीचे २० प्रस्ताव दाखल असून या पैकी एका प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. चालू वर्षात १८ प्रस्ताव चौकशीत आहेत. यापैकी तासगाव व कवठेमहंकाळचे प्रत्येकी एक व सांगली,मिरज येथील १८ प्रस्तावांची चौकशी व सुनावणी सुरू आहे.

  • हद्दपारी रद्द करण्यासाठी नेत्यांची लुडबुड

राजकीय हस्तक्षेपाने हद्दपारी रद्द करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. तर काहीजण थेट आर्थिक सेटलमेंट करण्यासाठी हात पाय हलवत असतात. हद्दपारीचा आदेश करताना वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांनी कोणताही राजकीय नेता, पदाधिकारी हस्तक्षेप करत असेल तर त्यास स्पष्ट नकार द्यावा. मुळात राजकारण्यांनी गुन्हेगारांना पाठबळ दिल्यास सामाजिक शांतता भंग होतेच, शिवाय गुन्हेगारांना बळ मिळाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडते याचे भान नेत्यांनाही असायला हवे.

गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातून हद्दपारीच्या कारवाईचा कायदेशीर तरतुदीचा आधार घेतला जातो. अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांकडून नविन गुन्हा घडला की, त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांकडून हद्दपारीचा प्रस्ताव प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येतो.

मिरज उपविभागात तासगांव, कवठेमंकाळ, सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, मिरज शहर,महात्मा गांधी चौक, कुपवाड औद्योगिक वसाहत, सांगली ग्रामीण, मिरज ग्रामीण ही पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची सातत्याने कुंडली तपासून एकापेक्षा अधिक गुन्हे असणाऱ्यांची हद्दपारी प्रस्तावासाठी निवड करण्यात येते. प्रस्तावावर सुनावणी होऊन एक किंवा दोन जिल्ह्यातून संबंधित गुन्हेगारास हद्दपार करण्यात येते.हद्दपारीच्या कारवाईची टांगती तलवार असल्याने गुन्हेगारांना त्याची धास्ती आहे. चालू वर्षात मिरज प्रांत अधिकाऱ्यांकडे दाखल २० प्रस्तावावर प्रक्रिया सुरू आहे. यातील काही प्रस्ताव प्रांतधिकाऱ्यांच्या अंतिम आदेशासाठी ठेवण्यात आले आहे.

तडीपारीच्या प्रस्तावाला मिरज उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडून निकाली काढले जाते, अशा प्रस्तावांची कायदेशीर गुणवत्ता तपासूनच कारवाई करण्यात येते. त्यामुळे मिरज सांगलीसह चार तालुक्यातील सराईत गुन्हेगार हद्दपार झाले आहेत. हद्दपारीनंतर गुन्हेगारास त्याच्या इच्छेनुसार अन्य जिल्ह्यात नेऊन सोडण्यात येते. हद्दपार काळात त्याचे वास्तव्य असलेल्या संबंधित पोलीस ठाण्यास त्याबाबत कळविण्यात येते. मात्र अलीकडच्या काळात हद्दपारी आदेशाचा भंग करून गुन्हेगार पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात वावरत असल्याचे आढळत आहेत. हद्दपार आदेशाचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

गतवर्षी विधानसभा निवडणूक काळात मिरज उपविभागातील वीस जणांना हद्दपार करण्यात आले, तर सुमारे ५० जणांना निवडणूक काळात चार दिवस तात्पुरते हद्दपार करण्यात आले होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील पोलीस ठाण्यांकडून त्यांच्या हद्दीतील समाजकंटकांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव दाखल करण्याची तयारी सुरु आहे.

सांगलीतील एकजण हद्दपार, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रस्ताव पाठवणे गरजेचे..!

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोट्या उर्फ मेघशाम अशोक जाधव रा. दत्तनगर सांगली या सराईत गुन्हेगारास सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी पोलिसांना दिले आहेत. तर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या दहशत माजविणारे काहीजण मोकाट फिरत आहेत, तर काहींच्याकडून कायदेशीर बाबींनी पोलिसांनी शपथपत्र घेतले आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | १५ तहसीलदारांची विभागीय चौकशी, गोलमाल झाल्याचा शासनाचा अंदाज.! दफ्तरांची तपासणी सुरू

Next Post

कुपवाडात खळबळ ! २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडात खळबळ ! २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून..!

कुपवाडात खळबळ ! २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group