• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | १५ तहसीलदारांची विभागीय चौकशी, गोलमाल झाल्याचा शासनाचा अंदाज.! दफ्तरांची तपासणी सुरू

Admin by Admin
June 28, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | १५ तहसीलदारांची विभागीय चौकशी, गोलमाल झाल्याचा शासनाचा अंदाज.! दफ्तरांची तपासणी सुरू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत लेखन प्रमाद दुरुस्तीचे आदेशाव्यतिरिक्त अधिकाराचा गैरवापर करून आदेश झाल्याने अनियमितता झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने ज्या अधिकार्‍यांच्या कार्यकाळात आदेश पारीत झालेत, त्या सर्व तहसीलदारांचा विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचा आदेश अवर सचिव संजय जाधव यांनी विभागीय आयुक्तांना दिल्याने पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी १५५ ची प्रकरणे तपासण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांचे तपासणीचे काम यामुळे सुरू झाले आहे.

अवर सचिव संजय जाधव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या १५५ अंतर्गत अनेक तहसीलदारांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन या कायद्याचा दुरुपयोग केल्याच्या अनेक तक्रारी शासनास प्राप्त झाल्याचे नमूद करून मागील दहा वर्षांची प्रकरणे तपासणीनंतर शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार या कायद्यांतर्गत फक्त लेखन प्रमाद दुरुस्तीच्या आदेशाव्यतिरिक्त अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे दिसत असल्याचे नमूद केले आहे.

नवीन शर्तीचे शेरे कमी करणे, कूळ कायद्यानुसार दखल करण्यात आलेले शेरे कमी करणे, आकारीपडबाबतचे शेरे कमी करणे, वारसाच्या नोंदीबाबत पारीत केलेले आदेश, खरेदी- विक्रीसंदर्भात पारीत करण्यात आलेले आदेश, इतर हक्कातील बोजे कमी केलेले आदेश, इतर हक्कातील पोकळीस्त शेरे कमी केलेले आदेश, इतर कोणत्याही कायद्यानुसार शेरे कमी केलेले आदेश या सर्व दुरुस्ती आदेशांद्वारे अधिकारांचा गैरवापर करून अनियमितता झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने वरील आदेश ज्या अधिकारांच्या कार्यकाळात पारीत झाले त्या सर्वांची विभागीय चौकशी करण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शासनाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील पंधरा तहसील कार्यलयांत १५५ अंतर्गत पारीत करण्यात आलेल्या आदेशाची तपासणी मोहीम सध्या सुरू आहे. यामुळे अनेक तहसीलदारांवर चौकशीचा ससेमीरा मागे लागणार असून, तर विभागीय चौकशीची टांगती तलवार असणार आहे. या आदेशामुळे अनेक तक्रारी शासनाकडे होणार, हे नक्की. चौकशीत प्रकरणे दाबली जाऊन क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला, तरीही नागरिक व ज्यांच्यावर अन्याय झाला ते थेट महसूलमंत्र्यांकडे तक्रारी करणार, हे नक्की असल्याने शासनाच्या या आदेशाने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post

बच्चनच्या रिंगटोननं कानाचा पडदा फाटला, तरी कोल्हापुरात डिजिटल अरेस्ट सुरुच; आता रिलायन्सच्या निवृत्त अधिकाऱ्याला ८ कोटींचा चुना, विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर

Next Post

मिरज | गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी यंत्रणा कामाला, मिरज उपविभागात २० हद्दपारीचे प्रस्ताव..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी यंत्रणा कामाला, मिरज उपविभागात २० हद्दपारीचे प्रस्ताव..!

मिरज | गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी यंत्रणा कामाला, मिरज उपविभागात २० हद्दपारीचे प्रस्ताव..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group