• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत दहशत माजवणाऱ्या म्होरक्याला हत्यारांसह घेतले ताब्यात : कुख्यात टोळी पकडली, पोलिसांचा मिरजेतील गुन्हेगारांवर वॉच.!

Admin by Admin
June 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत दहशत माजवणाऱ्या म्होरक्याला हत्यारांसह घेतले ताब्यात : कुख्यात टोळी पकडली, पोलिसांचा मिरजेतील गुन्हेगारांवर वॉच.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरजेतील सराईत गुन्हेगार रोहन कलकुटकी याच्यावर गोळीबार करून पळालेला कुख्यात गुन्हेगार सूरज चंदू कोरे (वय २५, रा. मिरज) हा त्याच्या टोळीसह शिरोली एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये लपला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २५) मध्यरात्री छापा टाकून कोरे याच्यासह त्याच्या पाच मित्रांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल, दोन काडतुसे, तीन सुरे, नऊ मोबाइल आणि अलिशान कार असा २२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सूरज कोरे याच्यासह प्रथमेश सुरेश ढेरे (२५), विशाल बाजीराव शिरोळे (२४), पवनसिंग संजयसिंग राजपूत (२७), सर्फराज बाळासो सय्यद (२३) आणि अफताब आयुब काझी (२४, सर्व रा. मंगळवार पेठ, मिरज, जि. सांगली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलदार वैभव पाटील यांना मिरजेतील कुख्यात गुन्हेगार सूरज कोरे हा त्याच्या टोळीसह शिरोली एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये लपल्याची टीप मिळाली होती. या टोळीकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे कारवाईदरम्यान प्रत्युत्तर होण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी दोन पथके तयार केली. मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये छापा टाकून झोपेत असलेल्या आरोपींना उठवून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तूल, एक हजार रुपयांची दोन काडतुसे, ५०० रुपयांचे तीन धारदार सुरे, १ लाख ७० हजारांचे ९ मोबाइल आणि २० लाखांची कार असा २२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत रवानगी केली. पुढील तपासासाठी त्यांचा ताबा शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आला. उपनिरीक्षक संतोष गळवे, शेष मोरे यांच्यासह अंमलदार वैभव पाटील, विलास किरोळकर, अमित मर्दाने, अनिकेत मोरे, सत्यजित तानुगडे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टोळीची मिरजेत दहशत

सूरज कोरे आणि त्याच्या टोळीची मिरजेत दहशत आहे. त्यांच्यावर मारामारी, दमदाटी, अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. रोहन कलकुटकी याच्यावर १८ जूनला भरदिवसा गोळीबार करून कोरे पळाला होता. बुधवारी ही टोळी शिरोली एमआयडीसी येथील हॉटेलमध्ये पोहोचली होती. त्यांच्या अटकेने मिरज पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Previous Post

लाचखोर वैभव साबळे निलंबित, लाचप्रकरणी नगरविकास विभागाची कारवाई

Next Post

सांगली ब्रेकिंग | सिव्हिल चौकात पुन्हा अपघात, एसटीने दुचाकीस्वारास उडवले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | सिव्हिल चौकात पुन्हा अपघात, एसटीने दुचाकीस्वारास उडवले..!

सांगली ब्रेकिंग | सिव्हिल चौकात पुन्हा अपघात, एसटीने दुचाकीस्वारास उडवले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group