• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | सिव्हिल चौकात पुन्हा अपघात, एसटीने दुचाकीस्वारास उडवले..!

Admin by Admin
June 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | सिव्हिल चौकात पुन्हा अपघात, एसटीने दुचाकीस्वारास उडवले..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

भरधाव एसटीने काल एका तरूणीला चिरडले. या अपघाताला बारा तासही उलटले नाहीत, तोवर आज पुन्हा त्याच रस्त्यावर भरधाव एसटीने एका दुचाकीस्वारास उडवले. रात्री साडेदहाच्या सुमारास सिव्हिल चौकात हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार वैभव गुरूदत्त कोळी (वय २१, हनुमान कॉलनी, सांगली) हा जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी, की सिव्हिल चौक ते स्टँड रस्त्यावर चोवीस तास वर्दळ असते. काल सकाळी जय मातृभूमी व्यायाम मंडळानजीक शर्वरी राजकुमार कुलकर्णी या तरूणीस एसटीने चिरडले. या अपघातानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली.

प्रशासनाविरोधात संतापाची लाट जनमाणसातून उमटली. त्यानंतर पालिकेने आज अतिक्रमण हटवण्याचा एका फार्स सकाळी केला. रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची नौटंकी केली आणि यंत्रणा तशीच राहिली. आज रात्री राममंदिर चौकातून वैभव कोळी हा दुचाकी (एमएच १० सीई ९४२३) वरून सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी बसस्थानकातून कोल्हापूर-माजलगाव एसटी (एमएच २० बीएट २७४०) भरधाव वेगाने येत होती. त्यात प्रवाशांची संख्याही अधिक होती.

सिव्हिल चौकात रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव एसटीने कोळी याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्याला काही अंतर फरफटत नेले. त्यानंतर चालकाने एसटी थांबवली. तोवर नागरीकांची मोठी गर्दी परिसरात जमा झाली. जखमी कोळी याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रवाशी आणि बघ्यांची मोठी गर्दी परिसरात होती. विश्रामाबग पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या घटनाची रात्री उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Previous Post

मिरजेत दहशत माजवणाऱ्या म्होरक्याला हत्यारांसह घेतले ताब्यात : कुख्यात टोळी पकडली, पोलिसांचा मिरजेतील गुन्हेगारांवर वॉच.!

Next Post

सांगली पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group