• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | कौटुंबिक वादातून बायकोच्या डोक्यात बांबूने घाव घालून नवऱ्याने केला खून ..! दोन मुलांसहित फरार

Admin by Admin
June 27, 2025
in क्राईम
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | कौटुंबिक वादातून बायकोच्या डोक्यात बांबूने घाव घालून नवऱ्याने केला खून ..! दोन मुलांसहित फरार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली शहरातील विजयनगर परिसरात कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शिलवंती पिंटू पाटील (वय ३०, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) हिचा डोक्यात बांबूने वार करून निर्घृण खून केला. गुरूवारी पहाटे हा प्रकार घडला.

खुनानंतर पती पिंटू पाटील हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला. संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच पिंटू पाटील याच्या शोधासाठी पथक मंगळवेढा परिसरात रवाना केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे. काही वर्षापासून तो सांगलीत राहताे. गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होत. मूळच्या नंदूर (जि. सोलापूर) येथील परंतू सांगलीत हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते. दोघांना दोन मुले आहेत. सध्या विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांसह राहत होते. शिलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती. तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता.

काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणांवरून सतत वाद होता. या वादास कंटाळून शिलवंती दि. १३ जून रोजी घर सोडून निघून गेली होती. पिंटूने संजयनगर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती पतीकडे परत आली होती. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू होती. शिलवंती परत आल्याचे संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते.

गुरूवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने बांबूने शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला. पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला. व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले. त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधले. शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील ही मृतावस्थेत पडल्याचे आढळले. परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती.

संजयनगरचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर तपासाबाबत सूचना केल्या.

विजयनगर – शाहूनगर भागात खळबळ :

पै- पाहुणे हळहळले

शिलवंती पाटील हीची आई, भाऊ तसेच हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना तिच्या खुनाची माहिती मिळताच ते दुपारी घटनास्थळी आले. त्यांनी शिलवंतीचा मृतदेह पाहून आक्रोश केला. शिलवंतीचा भाऊ आणि आई यांना तिच्या मृत्यूचा धक्का बसल्याचे दिसून आले.

Previous Post

ब्रेकिंग | मिरजेच्या संगम वाईन मधून घेतली पावणे बारा लाखांची दारू, कुपवाडात एलसीबीने पकडली, दोघांना अटक..!

Next Post

लाचखोर वैभव साबळे निलंबित, लाचप्रकरणी नगरविकास विभागाची कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

लाचखोर वैभव साबळे निलंबित, लाचप्रकरणी नगरविकास विभागाची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group