• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरजेच्या संगम वाईन मधून घेतली पावणे बारा लाखांची दारू, कुपवाडात एलसीबीने पकडली, दोघांना अटक..!

Admin by Admin
June 26, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | मिरजेच्या संगम वाईन मधून घेतली पावणे बारा लाखांची दारू, कुपवाडात एलसीबीने पकडली, दोघांना अटक..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कुपवाडजवळ बेकायदा विदेशी दारू, बीअरची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडला. यावेळी ११ लाख ७९ हजारांचा दारूसाठ, टेम्पो असा १६ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ADVT.

यावेळी अक्षय प्रदीप वाघमारे (वय २०, रा. मुलाणी वस्ती, आटपाडी), नानासाहेब आनंदा पाटील (वय ५१, रा. पाटील मळा, आटपाडी) या दोघांना अटक करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील सहायक निरीक्षक जयदीप कळेकर व सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, अतुल माने, रणजित जाधव यांना दि. २० रोजी अक्षय वाघमारे हा टेम्पो (एमएच १० डीटी ७२०५) मधून विदेशी दारू घेऊन कुपवाड जवळील तासगाव फाटा, कुमठे फाटा या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कुपवाडजवळ थांबून वाहनांची पाहणी सुरू ठेवली. तेवढ्यात पांढऱ्या रंगाचा टेम्पो आल्यानंतर तो अडवला. चालक अक्षय वाघमारे व शेजारी बसलेल्या नानासाहेब पाटील या दोघांना ताब्यात घेतले. टेम्पोची झडती घेतली. तेव्हा मागील हौद्यात विदेशी दारू व बीअरचे बॉक्स आढळून आले.

दारूसाठ्याबाबत चौकशी केल्यानंतर दोघांकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. माल कोठून आणला असे विचारता, मिरज येथील संगम वाइन शॉपमधून घेऊन आटपाडी येथे जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचांसमक्ष ११ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दारूसाठा, पाच लाखांचा टेम्पो असा १६ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांना मुद्देमालासह कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक कळेकर, अंमलदार संकेत मगदूम, आमसिद्ध खोत, इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, अनंत कुडाळकर, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, सुशांत चिले यांच्या पथकाने कारवाई केली.

बेकायदा विक्रीसाठी वाहतूक

मिरजेतून विनापरवाना पावणेबारा लाखांची दारू आटपाडी परिसरात नेऊन ती बेकायदा विक्री केली जाणार होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती पकडली गेली. विनापरवाना दारू पुरवणाऱ्या वाइन शॉप मालकाची या प्रकरणात चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.

Previous Post

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Next Post

सांगली ब्रेकिंग | कौटुंबिक वादातून बायकोच्या डोक्यात बांबूने घाव घालून नवऱ्याने केला खून ..! दोन मुलांसहित फरार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | कौटुंबिक वादातून बायकोच्या डोक्यात बांबूने घाव घालून नवऱ्याने केला खून ..! दोन मुलांसहित फरार

सांगली ब्रेकिंग | कौटुंबिक वादातून बायकोच्या डोक्यात बांबूने घाव घालून नवऱ्याने केला खून ..! दोन मुलांसहित फरार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group