
कुपवाड प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या
सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेमार्फत विठ्ठल गजराच्या थीम आधारित नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतरी कर्मचारी वर्ग या कार्यक्रमात यांनी ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष योगासन करत सहभाग घेतला. विठ्ठलनामाच्या गजरात योगासने सादर करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन करताना संस्थेच्या डायरेक्टर सौ. संगीता पागनीस यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. योग हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाचे प्राचार्य अधिकराव पवार यांनीही योगामुळे शरीरातील सकारात्मक बदलांची माहिती दिली.
यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करत उत्तम प्रदर्शन केले. नव कृष्णा व्हॅली स्कूलतर्फे नेहमीच विद्यार्थ्यांना विविध खेळांचे मार्गदर्शन दिले जाते. तसेच, सांगली जिल्ह्यातील सर्व अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध असलेले हे एकमेव क्रीडा संकुल आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थापक प्रवीण लुंकड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


