• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित

Admin by Admin
June 9, 2025
in क्राईम
1 min read
0
चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

वाहतूक नियमनासाठी नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्या चौकात कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले. निलंबित करण्यात आलेले तीन पोलीस कर्मचारी खडक वाहतूक विभागातील आहेत.

पोलीस हवालदार संतोष चंद्रकांत यादव, बालाजी विठ्ठल पवार, मोनिका प्रवीण करंजकर अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. वाहतूक नियमनासाठी वाहतूक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला हद्दीतील चौक आणि प्रमुख रस्त्यावर नेमणूक केली जाते. चौकातील वाहतूक नियमन ही कर्मचाऱ्याची जबाबदारी असते. मात्र, अनेक कर्मचारी त्यांना नेमून दिलेले चौक सोडून इतरत्र उभे राहतात. गाड्या अडवून त्यांच्याकडे वाहन परवाना, तसेच गाडीची कागदपत्रे मागून कारवाई केली जाते.

वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी घोळक्याने एका ठिकाणी थांबून कारवाई करतात. खडक वाहतूक विभागातील हवालदार यादव यांची १५ मे रोजी टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौक, पवार यांची हिराबाग चौक, तसेच करंजकर यांची भावे चौकात नेमणूक करण्यात आली होती. प्रत्यक्षात यादव, पवार आणि करंजकर हे नेमणूक केलेले चौक सोडून पूरम चाैकात आले. त्यांनी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली. तिघे कर्मचारी नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच चौकात वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे आढळले. त्यानंतर वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Previous Post

मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!

Next Post

ब्रेकिंग ! मुंबईत दोन फास्ट लोकलचा अपघात, सहा जणांचा मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग ! मुंबईत दोन फास्ट लोकलचा अपघात, सहा जणांचा मृत्यू

ब्रेकिंग ! मुंबईत दोन फास्ट लोकलचा अपघात, सहा जणांचा मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group