• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!

Admin by Admin
June 9, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी बातमी | मिरजेतील तणाव तब्बल चार तासांनी निवळला, पोलिसांची यशस्वी भूमिका, तातडीने निर्णय..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरात असणार्‍या एका प्रार्थनास्थळाच्या संरक्षक भिंतीवर नाचल्याच्या कारणातून मिरजेत रविवारी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत एकास ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मिरजेतील तणाव तब्बल चार तासानंतर निवळला. यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी सांगितले आहे.

ADVT.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरातून रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लग्नाची वरात निघाली होती. ही वरात ब्राह्मणपुरी परिसरातील एका प्रार्थनास्थळाजवळ पोहोचली असता, वरातीमध्ये नाचणार्‍या काही तरुणांनी प्रार्थनास्थळाच्या संरक्षक भिंतीवर चढून नाचण्याचा प्रकार केला. त्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी एक गट मिरज शहर पोलिस ठाण्यासमोर तीन तासापासून ठिय्या मारून थांबला होता. अखेर पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी संबंधितास ताब्यात घेतलेे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर मिरजेतील तणाव तब्बल चार तासानंतर निवळला. परंतु या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Previous Post

ब्रेकिंग | भल्या पहाटे सांगलीत थरारक घटना; भाजी विक्रेत्या तरुणाची भररस्त्यात हत्या

Next Post

चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित

चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group