• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग ! मुंबईत दोन फास्ट लोकलचा अपघात, सहा जणांचा मृत्यू

Admin by Admin
June 9, 2025
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग ! मुंबईत दोन फास्ट लोकलचा अपघात, सहा जणांचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मुंबई लोकलमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. ठाण्यातील दिवा- मुंब्रा दरम्यान ही घटना घडली आहे. प्रवाशी नेमके लोकलमधून पडले की, पुष्पक एक्सप्रेस याबाबत स्पष्टता नाही. कसारा फास्ट लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात असताना ही दुर्घटना घडली.

आठ ते बारा प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे प्रवासी दरवाज्यावर लटकून प्रवास करत असल्याने घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार सहा प्रवाशी मृत झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचे कारण ट्रेनमधील क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्याचे मानले जात आहे. ट्रेन इतकी भरलेली होती की, प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करत होते, त्यादरम्यान हा अपघात झाला.

सध्या रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील या दुर्घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. फडणीस हे आज सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या शुभारंभासाठी सोलापूरला येणार होते. मात्र मुंबईतील दुर्घटनेमुळे हा दौरा रद्द झाला आहे.

Previous Post

चौक सोडून घोळक्याने कारवाई; वाहतूक शाखेतील तीन पोलीस निलंबित

Next Post

ब्रेकिंग | सांगली पोलीस दलातील ‘या’ चार पोलिसांची खातेनिहाय चौकशी होणार .!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | सांगली पोलीस दलातील 'या' चार पोलिसांची खातेनिहाय चौकशी होणार .!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group