• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इस्लामपुरात माजी नगरसेवक वैभव पवार यांच्यासह दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Admin by Admin
March 23, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इस्लामपुरात माजी नगरसेवक वैभव पवार यांच्यासह दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर : गोपनीय खबऱ्या प्रतिनिधी / बँक कर्जाच्या वसुलीपोटी जातिवाचक शिवीगाळ करीत जबरदस्तीने दुचाकी काढून घेतल्याबद्दल एम. डी. पवार पीपल्स बँकेचे संचालक व माजी नगरसेवक वैभव पवार यांच्यासह अन्य दोघांवर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सदानंद केशव चांदणे (वय ५१, रा. चर्च रोड, इस्लामपूर) यांनी पोलिसांत रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव अशोकराव पवार, हेमंत जाधव, खांबे साहेब (पूर्ण नाव नाही, रा. इस्लामपूर) अशा तिघांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदानंद चांदणे व सुवर्णा सुभाष चिकुर्डेकर यांनी एकत्रितरीत्या बँकेतून ऑक्टोबर २०१८ मध्ये घरबांधणीसाठी सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांचे हे कर्ज थकीत आहे. त्याच्या वसुलीसाठी जानेवारी ते १६ मार्चअखेर दोघांकडे तगादा लावण्यात आला होता. २२ जानेवारी रोजी पवार यांनी चांदणे यांना बँकेत बोलावून कर्ज भरले नसल्याबाबत विचारणा करीत त्यांची दुचाकी (एमएच १० डीके ८२५७) ही जबरदस्तीने काढून घेतली. तसेच सहकर्जदार महिलेच्या नावाने शिवीगाळ केली.

त्यानंतर हेमंत जाधव व खांबे यांनी चिकुर्डे येथील चांदणे आणि सुवर्णा चिकुर्डेकर यांच्या महिला उद्योग कारखान्यावर जाऊन उद्योगसमूहाच्या चाव्या द्या, नाही तर मारहाण करीत तेथून बाहेर काढण्याची धमकी दिली. १९ फेब्रुवारी रोजी जाधव यांनी चांदणे यांना बँकेत बोलावून घेतले. त्यावेळी वैभव पवार यांनी ‘पैसे भर, नाही तर तुझ्या घरादाराला कुलूप लावीन,’ असे धमकावत जातिवाचक शिवीगाळ करून त्यांना बाहेर काढले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत.

Previous Post

मिरजेतील बेळगांव गेट झोपडपट्टी उध्वस्त केल्यास रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या करण्याचा दलित महासंघाचा इशारा…

Next Post

तासगाव कारखान्याच्या ऊस बिलासाठी नितीन गडकरींच्या दौऱ्यात आंदोलन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तासगाव कारखान्याच्या ऊस बिलासाठी नितीन गडकरींच्या दौऱ्यात आंदोलन

तासगाव कारखान्याच्या ऊस बिलासाठी नितीन गडकरींच्या दौऱ्यात आंदोलन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group