• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

Admin by Admin
June 1, 2025
in क्राईम
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात चालत निघालेल्या वृद्धेला भरधाव चारचाकीने जोराची धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विमल रामचंद्र भोसले (वय ७० रा.चांदणी चौक, सांगली) यांचा आज (ता. ३१) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हा अपघात हा १३ मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला. याप्रकरणी ऋतिक उत्तम तरटे (रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चारचाकीचालक शंकर कुंडलिक मिरजे (रा. कागवाड, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृत विमला भोसले या आपल्या कुटुंबीयांसह शहरातील चांदणी चौक परिसरात राहत होत्या. त्या सांगली मिरज रस्त्यावरून चालत निघाल्या होत्या. यावेळी गेस्ट हाऊस परिसरात त्या आल्या असता पाठीमागून संशयित चारचाकी चालक शंकर मिरजे याने त्यांच्या ताब्यातील चारचाकी (एमएच १२, एचव्ही ४४४१) भरधाव वेगात घेऊन आला. त्याने भोसले यांना पाठीमागून जोराची धडक दिली.

ADVT.

या अपघातात विमल भोसले या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच भोसले यांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी तरटे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

Previous Post

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

Next Post

ब्रेकिंग | मिरजेत बारमध्ये जोरदार हाणामारी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | मिरजेत बारमध्ये जोरदार हाणामारी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group