• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

Admin by Admin
June 1, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांना जिल्हांतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आले. १७८ जणांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पाडली गेली. त्यापैकी ९ जणांना नियुक्तीच्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली.पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी बदली ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले आहेत. या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील २७ पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या ज्या अंमलदारांची सलग पाच वर्षे पूर्ण होत आहेत, अशांकडून बदलीसाठी अर्ज मागवले गेले होते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीची तीन पोलिस ठाणे किंवा शाखा यांचा उल्लेख करण्यास सांगितले गेले.

अधीक्षक घुगे यांनी बदलीसाठी अर्ज केलेल्या अंमलदारांचे म्हणणे ऐकून घेत बदलीचे गॅझेट रात्री उशिरा जारी केले. ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे हे गॅझेट असल्याचे पोलिस दलात चर्चा होती. सेवेचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या अंमलदारांची बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय अशा १७८ जणांच्या बदलीचे गॅझेटही प्रसिद्ध केले. सहायक फौजदार, हवालदार, पोलिस नाईक, शिपाई यांच्या बदल्यांचा आदेश प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यमुक्त करावे. तसेच ज्यांच्याकडे प्रलंबित प्रकरणे आहेत त्यांनी तत्काळ निर्गती करून घ्यावेत, असा आदेशही अधीक्षक घुगे यांनी दिला आहे.

ADVT.

विनंती बदल्यांकडे वेध

विनंतीनुसार बदली, वैद्यकीय कारणास्तव बदलीसाठी विनंती अर्ज करण्यात आलेल्यांच्या बदल्या अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. पोलिस अधीक्षक संदीप घुगे हे गॅझेट लवकरच प्रसिद्ध करतील. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांची अद्याप उचलबांगडी करण्यात आलेली नाही. त्यांची याबाबत दबक्या आवाजाने चर्चा सुरू होती.

..यांच्या बदल्या

सहाय्यक फौजदार – २३

हवालदार – ६१

पोलिस नाईक – १३

शिपाई – ८१

Previous Post

विवाहितेला आमिष दाखवून बलात्कार

Next Post

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | 'चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू'; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group