• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विवाहितेला आमिष दाखवून बलात्कार

Admin by Admin
June 1, 2025
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

विवाहितेला तिच्या मुलासह सांभाळण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ चित्रण करून, पोलिसात तक्रार दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.याप्रकरणी संशयित ऋत्विक अरुण वाडकर (रा. कारंदवाडी, ता. वाळवा) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता 24 वर्षीय असून ती वाळवा तालुक्यातील एका शहरात राहत आहे. संशयित ऋत्विक याने जानेवारी 2024 पासून डिसेंबरपर्यंत ‘तुला आणि तुझ्या मुलांना सांभाळतो’ असे आमिष दाखवून विवाहितेशी जवळीक साधली. सांगलीतील कोल्हापूर रोडवरील एका लॉजवर तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली. त्याची कल्पना तिने वाडकर याला दिली. यावर ‘तुला आमच्या घरचे लोक स्वीकारणार नाहीत’, असे सांगून तिच्याशी वाद घातला.

काही दिवसांनी 1 मे आणि 13 मे रोजी पुन्हा त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. यावेळी मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रण केले. पीडितेने त्याला जाब विचारला. यावरून दोघांचा वाद झाला. त्यावेळी संशयिताने पीडितेचा मोबाईल आपटून फोडला. पोलिसात गेल्यास व्हिडीओ चित्रण व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बलात्कार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

विश्रामबाग, सांगलीवाडीत घरफोडी

Next Post

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

सांगली जिल्ह्यातील 'पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध': १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group